Saturday, August 29, 2015

वारसदार - भाग ६

 
 http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_29.html

दारची बेल वाजली तेव्हा नीलाची आई काहीशी आश्चर्यचकित झाली. नीला कॉलेजात गेली होती आणि बाबा ऑफिसात! अशा वेळी घरी कोण येणार अशा विचारातच तिनं दरवाजा उघडला. समोर शलाकाला पाहून तिला आश्चर्यच वाटलं. "हिला आज कॉलेज वगैरे कसं नाही!" अशा विचारातच त्यांनी तिचं स्वागत केलं. "ये ना शलाका! आज किती दिवसांनी येतेस तू!" त्यांनी शलाकाला म्हटलं. शलाका हॉलमध्ये खुर्चीवर बसली. "आज माझं किनई माझ्या चुलत मावशीकडे काम होतं म्हणून मी आज दांडी मारली कॉलेजला!" नीलाच्या आईची साशंक नजर चुकवायचा प्रयत्न करीत शलाका बोलत होती. "हो का! सहजच  काम निघालं वाटतं मावशीकडे !" आई म्हणाली. शलाकाने एक दीर्घ श्वास घेतला. "मावशी, मला खास तुमच्याशीच बोलायचं होतं! म्हणून कॉलेजात न जाता मी थेट आज इथे आले!" शलाकाने थेट मुद्द्यालाच हात घातला. 

पुढील जवळजवळ दीड तासभर दोघी बोलत होत्या, नीला आणि सुशांतबद्दल! नीलाला सुशांत मनापासून आवडला आहे हे तिच्या प्रत्येक कृतीतून शलाकाने गेलं वर्षभर पाहिलं होतं. पण आता ज्या प्रकारे रावांचे शत्रू जिथे संधी मिळेल तिथे ह्या दोघांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत होते त्यामुळे नीलाला खूपच मानसिक त्रास होत होता. आणि त्यामुळेच तिनं स्वतःला अभ्यासात पूर्णपणे गुंतवून घेतलं होतं. "मावशी, तिला बंगलोरला कोणत्याही परिस्थितीत जाऊन देऊ नका! म्हणजे जिथं सुशांत जाईल तिथं नको! त्या दोघांचं भलं होईल अशीच माझी मनापासून इच्छा आहे पण हे राजकारणी लोक आपापसातल्या वैरापायी उगाच ह्या दोघांचा बळी घायला नकोत!" शलाका अगदी कळकळीने सांगत होती. आईला तिचं म्हणणं बऱ्यापैकी पटत होतं पण नीलाला समजवायचं कसं हा मोठा प्रश्न होता. शेवटी मग मी बाबांशी बोलून बघते असं म्हणत आईने शलाकाचा निरोप घेतला. रात्री मग बाबांशी आईने हा विषय काढल्यावर ते ही चिंतेत पडले.
पुढे वाचा खालील लिंक वर …  


http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_29.html 

Sunday, August 23, 2015

वारसदार - भाग ५

 

http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post.html 

पुढील तास दोन तासभर नीलाची समजूत घालण्यात गेले. "राजकारणी लोकांच्या नादाला लागण्यात अर्थ नाही असं म्हणतात ते काही उगीच नाही!" बाबा म्हणत होते. "तसं म्हटलं तर फार काय मोठं घडलं नाही आणि जे काही घडलं त्यात तुझी काही चूक नाही!" नीलाची समजूत घालण्यात आईने सुद्धा पुढाकार घेतला होता. दोघांच्या वास्तववादी बोलण्यानं नीला मात्र बरीच सावरली होती. अभ्यासाची बरीच मजल मारायची होती. ह्या घटनेने निराश होऊन बसण्यात काही अर्थ नव्हता. तिने आपल्या अभ्यासिकेत स्वतःला दोन तासभर कोंडून घेतलं. सुरुवातीच्या काही वेळानंतर अभ्यासात तिची चांगलीच लिंक लागली. दोन तासाभराचा अभ्यास झाल्यावर काहीशा प्रसन्न मनाने ती बाहेर हॉलमध्ये येण्यासाठी दार उघडायला गेली तर बाबा हळू आवाजात कोणाशी तरी बोलत असल्याचा आवाज तिला ऐकू आला. खरंतर असं लपून ऐकायची तिला सवय नव्हती पण नक्कीच ज्या अर्थी बाबा हळू आवाजात बोलत आहेत म्हणजे हा फोन सकाळच्या घटनेशी संबंधित असणार अशी अटकळ तिने बांधली. 

पुढे वाचा 


http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post.html

Saturday, August 15, 2015

वारसदार - भाग ४

 

http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_15.html 

कॉलेजात गेल्यावर मात्र तिची निराशाच झाली. सगळीकडे अगदी सामसूम होती. पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील काही मुलं लायब्ररीमध्ये चर्चेला बसली होती तितकंच! पण तिच्या वर्गातील कोणी दृष्टीला पडलं नव्हतं. आणि अचानक तिची नजर विकीवर पडली. विकी तोच तो ज्याने रावांच्या भाषणात भ्रष्टाचाराचा प्रश्न उगाचच विचारून खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. विकी एकटा नव्हता तर त्याच्या सोबत त्याचा टवाळ कंपू सुद्धा होता. "A.T.K.T. कमी करायचा जोरदार प्रयत्न चालू आहे वाटतं!" नीला मनातल्या मनात स्वतःशीच पुटपुटली. तिला पाहताच विकीच्या नजरेत मात्र अगदी चमक भरली. नीलाच्या तडफदार उत्तराने त्याचा भर सभागृहात पाणउतारा झाला होता. खरतर असा प्रश्न विचारून गडबड करण्याचा त्याचा पिंड नव्हता. म्हणजे त्याचा पिंड मुळचा बदमाशगिरीचाच पण व्याख्यानात प्रश्न विचारणे वगैरे प्रकार त्याला झेपण्यासारखे नव्हते. पण त्याने हा प्रश्न विचारला तो त्याला कोणीतरी सांगितलं म्हणून! हा कोणीतरी होता सत्ताधारी पक्षाचा ओमकार शर्मा ! रावांना उगाचच कॉलेजात भाव मिळतोय हे शर्माला रुचलं नव्हतं आणि म्हणून त्याने विकीला हाताशी धरलं होतं. पण नीलाने हा डाव हाणून पाडला होता आणि उलट त्यामुळे रावांना अधिकच प्रसिद्धी मिळाली होती. 

पुढे वाचा 

http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_15.html 

Sunday, August 9, 2015

वारसदार - भाग ३

 

http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_9.html 

सर्वच पक्षांच्या प्रवक्त्यांनी बाजू मांडून झाल्यावर सुधीरराव एकूण चर्चेचा आढावा घेण्यासाठी म्हणून पुन्हा व्यासपीठावर आले. त्यांचे आढावा घेण्याचे काम सुरु असतानाच कॉलेजातील विघ्नसंतोषी मुलांपैकी एक अचानक उठला आणि "इथे सर्व पक्ष जरी सुधारकांचा आव आणत असले तरी जोवर भ्रष्टाचारी लोक सर्व पक्षांत ठासून भरले आहेत तोवर ह्या देशाचे काही भले होणार नाही !" असे अगदी जोरात ओरडला. अगदी दृष्ट लागण्यासारख्या झालेल्या कार्यक्रमाला हे असं गालबोट लागणं म्हणजे अगदी दुर्देवी घटना होती. सुधीररावांचा चेहरा रागाने अगदी लालेलाल झाला होता. नीलाच्या ध्यानात हे सारं काही आलं. तात्काळ धावत जाऊन ती सुधीररावांच्या बाजूला जाऊन उभी राहिली. " आपल्या कॉलेजात आलेल्या माननीय पाहुण्यांसोबत असा अनादर व्यक्त करणारी मुलं आपल्या कॉलेजात आहेत ही दुर्दैवाची गोष्ट! पण ज्याप्रमाणे अशा मुलांच्या उपस्थितीमुळे आपल्या कॉलेजच्या प्रगतीत जशी बाधा न येता आपलं कॉलेज प्रगतीची शिखरं गाठत आहे त्याचप्रमाणे देशातील मोजक्या भ्रष्टाचारी लोकांच्या अस्तित्वाने आपल्या देशाच्या प्रगतीत बाधा येणार नाही!" नीलाच्या ह्या करारी बोलण्याने वातावरण अगदी पालटून गेलं. सभागृहातील मुलांनी एव्हाना त्या खट्याळ कार्ट्याला आणि त्याच्या साथीदारांना सभागृहाबाहेर पिटाळून लावलं होतं. सुधीरराव मोठ्या कौतुकाने नीलाकडे पाहत होते. इतक्यात मग एका अभ्यासू मुलाने FDI वर  प्रश्न विचारायला सुरुवात केली. 

पुढे वाचा 

 http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_9.html



 

Saturday, August 8, 2015

वारसदार - भाग २

 
 http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_8.html

"आई, हा आमच्या कॉलेजातील सुशांत बरं का! अगदी स्कॉलर मुलगा आहे!" नीला मोठ्या कौतुकाने आईशी सुशांतची ओळख करून देत होती. तिचे बाबा मात्र शांतपणे आपल्या डिशचा आस्वाद घेण्यात दंग होते. "नमस्कार!" सुशांतने हात जोडून नीलाच्या आईला प्रणाम केला. "हिचे वडील थोडे खाष्टच दिसतात!" चिकन लेगचा आस्वाद घेण्यात मग्न असलेल्या तिच्या बाबांकडे नजरेचा कटाक्ष टाकत सुशांत मनातल्या मनात पुटपुटतो इतक्यात "हाऊ आर यु यंग मॅन !" म्हणत त्यांनी त्याला त्यांच्यात सामील होण्याची विनंती केली. "आणि हो त्या दिवशी नीलाला कॉलेजात लिफ्ट दिल्याबद्दल धन्यवाद!" बाबांच्या ह्या मनमोकळ्या बोलण्याने आपण उगाचच ह्यांच्याविषयी मत बनविण्याची घाई करत होतो ह्याचा सुशांतला मनातल्या मनात पश्चात्ताप झाला. 

http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_8.html 

Tuesday, August 4, 2015

वारसदार - भाग १

 
 http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_5.html

 सुधीररावांच्या आक्रस्ताळपणाकडे दुर्लक्ष करून सुशांतने आपला अभ्यास सुरूच ठेवला. "असली पुस्तकं वाचत बसलो असतो तर हा बंगला, ही जमीन कधीच मिळवता आली नसती!" सुधीररावांनी आपला संताप सुरूच ठेवला तसा न राहवून सुशांत म्हणाला, "हवीय कोणाला तुम्हांला तुमची संपत्ती!" त्यांच्या वाक्याने होऊ घातलेला सुधीररावांच्या संतापाचा स्फोट बाहेरून येणाऱ्या SUV च्या दर्शनाने त्यांना आवरता घ्यावा लागला. 

पुढे वाचा …

http://patil2011.blogspot.in/2015/08/blog-post_5.html