Monday, May 16, 2016

बावखल

 
 http://patil2011.blogspot.in/2016/05/blog-post_47.html
वसई गेले काही वर्षांपासुन सामाजिक स्थित्यंतराचा अनुभव घेत आहे. हे स्थित्यंतर जसे वसईतील नागरिकांच्या व्यवसायातील / राहणीमानाच्या बदलांच्या स्वरुपात आढळुन येतं त्याचप्रमाणे ते त्यांच्या विचारसरणीत होणाऱ्या बदलांच्या स्वरुपात देखील आढळुन येतं. 

वसईतील बराचसा समाज हा काही काळापुर्वी शेतीप्रधान होता. वाडवडिलार्जित शेतीवाडीवर उपजिवीका करणे हा बऱ्याच समाजाचा मुख्य व्यवसाय होता. वाडीतील पिकांच्या सिंचनासाठी त्यावेळी बैलजोडीवर हाकले जाणारे रहाट असत आणि विहिरीऐवजी छोटी तळी ज्यांना बावखल म्हणुन संबोधिले जाते त्यांचा वापर केला जात असे. त्याकाळी विहिरीऐवजी बावखलांची प्रथा वसईत रूढ का झाली असावी ह्याविषयी अधिकृतरित्या माझ्याकडे संदर्भ उपलब्ध नाहीत. पण जमिनीची मुबलकता आणि कदाचित विहिरी खणण्यासाठी / तिला बंधारा घालण्यासाठी बाह्य घटकांवर असणारी अवलंबिता ही मुख्य कारणे बावखलांची लोकप्रियता वाढीस लागण्यासाठी कारणीभूत असावीत. 
 
http://patil2011.blogspot.in/2016/05/blog-post_47.html

वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ८ - ९

 
http://patil2011.blogspot.in/2016/05/blog-post_10.html

खरंतर प्रत्यक्षातील ही सहल आटोपून ४० दिवस होतं आले. पण ह्या शृंखलेच्या माध्यमातुन ही सहल पुन्हा एकदा अनुभवली. आज शेवटच्या ह्या दोन्ही दिवसांचं एकत्रित वर्णन ह्या भागात करतोय!

जिम कॉर्बेटचे वर्णन लिहिताना तिथल्या कडीपत्याचे वर्णन करायचं राहुन गेलं. जीपच्या आजुबाजूला बागडणाऱ्या ह्या कडीपत्याची चव घेण्याचा मोह आम्हांला आवरत नव्हता. पण नियमानुसार जीपमधुन बाहेर उतरून ह्याचे पान तोडण्याची परवानगी नव्हती. जणु काही तीन तासात केवळ डरकाळी ऐकवणारा वाघ आमचं एक पाऊल जीपबाहेर पडताच एक दमदार उडी मारुन आम्हांला घेऊन जाणार होता.

http://patil2011.blogspot.in/2016/05/blog-post_10.html 
 

Sunday, May 1, 2016

वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ७

 
 http://patil2011.blogspot.in/2016/05/blog-post.html

वीणा वर्ल्डच्या इतिहासात आम्ही प्रथमच आंघोळ न करता बाहेर पडणार होतो. जंगलात भयंकर धुळ उडण्याची शक्यता लक्षात घेता सफारी नंतर परतल्यावरच आंघोळ करणे कसे सयुक्तिक ठरेल ह्यावर सचिनने अख्खी अडीच मिनिटे खर्च केली होती. सकाळी साडेपाच वाता नाही म्हणा कितीजणं आंघोळ करून तयार झाली असती हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. 

इतक्या भल्या पहाटे उठण्याची सवय नसल्याने काहीसे संभ्रमावस्थेत असलेले  चेहरे!

http://patil2011.blogspot.in/2016/05/blog-post.html 

वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ६

 
 http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_30.html
आज सहावा दिवस ३० मार्च! आदल्या दिवशी रात्रीची एक कहाणी सांगायची राहुन गेली. रात्री नेहमीप्रमाणे सचिन दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आम्हांला समजावून सांगत होता. त्यात पहिला क्रमांक होता हनुमान मंदिराचा आणि मग झु अर्थात प्राणी संग्रहालयाचा! बोलता बोलता सचिन म्हणाला की ह्या प्राणी संग्रहालयापर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ २ किमी अंतराचा चढणीचा रस्ता आहे. हे ऐकुन आमच्या बसमधील काहीजणांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं. ह्या चढणीवरील झुपेक्षा दुसरा एको केव्स (Eco Caves) चा पर्याय बसमधील काही जणांना पसंद होता. 
ह्यावरून मग एक वैचारिक चर्चासत्र झालं. "ठरलेल्या कार्यक्रमापेक्षा जर वेगळे ठिकाण घ्यायचं असेल तर मला मुख्य ऑफिसातून परवानगी घ्यावी लागेल आणि तुम्हां सर्वांना एक लेखी निवेदन द्यावं लागेल!" नियमाला बांधलेल्या सचिनने आपली भुमिका स्पष्ट केली. 
  http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_30.html