Saturday, January 10, 2015

अलिप्ततावाद!!

 

मागील शनिवारी विक्रम गोखले ह्यांचं चतुरंग मधील सदर वाचलं. आपल्या वडिलांनी आपल्याला जीवनातील तत्त्वज्ञानाचे धडे कसे दिले हे त्यांनी अगदी सुंदरपणे मांडलं होतं. त्यांचं एक वाक्य खूप लक्षात राहिलं. "पन्नाशीच्या आसपास केव्हातरी अलिप्ततावाद लक्षात आलेला एक पुरुष आहे!" 
ह्या वाक्याने मनात आलेले हे विचार! विक्रम गोखले ह्यांना ह्यातील कोणता अलिप्ततावाद अभिप्रेत होता ह्यावर भाष्य करण्याचं धाडस मी करणार नाही.
लहानपणी आपण प्रत्येक गोष्टीत अगदी रस घेत असतो. ह्या नाविन्यपूर्ण जीवनातील प्रत्येक गोष्ट शिकण्याची उमेद आपण बाळगून असतो. हळूहळू आपण आयुष्यातील अनुभवाला सामोरे जाऊ लागतो. काही सुखदायक तर काही कटू! प्रत्येकाची हे अनुभव पचविण्याची क्षमता वेगवेगळी असते. काहींना पहिल्या काही कटू अनुभवांतच वैराग्य येतं तर काहीजण संकटाचे, दुःखाचे पहाड पेलून सुद्धा आयुष्यातील उत्साह राखून असतात. 


http://patil2011.blogspot.in/2015/01/blog-post_10.html 

No comments:

Post a Comment