http://patil2011.blogspot.in/2015/06/blog-post_20.html
ज्यात जैवशास्त्रीय बदल घडवून आणून त्याला महाकाय शक्ती प्रदान करण्यात आली आहे असा एक डायनासोर मोकळा सुटतो. त्यामागे सुद्धा त्याची विकसित झालेली बुद्धी असावी असा तर्क करायला वाव असतो. त्या डायनासोरच्या विध्वंसात मग ही मुले सापडतात. पण काही वेळातच आपली सुटका करून घेण्यात यश मिळवतात. प्रेक्षक जितका वेळ लहान मुलं एकटी संकटाचा मुकाबला करत असतात ततोवर जीव कंठाशी आणून चित्रपटाशी एकरूप असतात. पण मग ती मोठ्या माणसांना मिळाल्यानंतर आपल्या मनावरील दडपण आपसूकच कमी होतं. परदेशी सिनेमातील संवाद काळजीपूर्वक ऐकायची आपल्याला सवय विकसित करावी लागते. लहान लहान प्रसंगातून आपल्यासमोर विविध पात्रांच्या व्यक्तिरेखा उलगडत जातात. लहान भावाच्या मनात आपले आई वडील एकमेकांपासून वेगळे होण्याचं असलेलं भय, त्यांच्या आई आणि मावशीच्या संवादातून आपल्यासमोर येणारं त्यांच्या नात्याची झलक वगैरे वगैरे!! मावशीबाई अगदी मोठ्या हुद्द्यावर असतात आणि त्यांचं एक प्रेमपात्र चार गोंडस (?) डायनासोरना प्रशिक्षित करीत असते. ह्या प्रेमपात्राचे आणि मावशीबाईचे काहीसं बिनसलेलं असल्याने ते फक्त व्यावसायिक संबंध राखून असतात. सर्वसामान्य परिस्थिती असेल तर कोणत्याही (विवाहित / अविवाहित ) जोडप्यातील संबंध ताणलेलेच असायला हवेत आणि जर ते सुरळीत व्हायला हवे असतील तर एखादी आपत्ती यायला हवी असा काहीसा समज चित्रपट पाहून होऊ शकतो. पण खरे आणि चित्रपटातील जीवन वेगवेगळ असते हे लक्षात असून द्यात!!
पुढे वाचा
http://patil2011.blogspot.in/2015/06/blog-post_20.html
No comments:
Post a Comment