Saturday, October 3, 2015

वारसदार - भाग ८

 

http://patil2011.blogspot.in/2015/10/blog-post.html 

"कुलकर्णींना सांगा मी निवडणूक लढवायला तयार आहे!" रात्री आईबाबा आणि नीला असे सर्वजण जेवायला बसले असताना नीला सहजपणे म्हणाली. दोघांच्याही तोंडातला घास तोंडातच राहिला. आपली पोरगी इतका मोठा निर्णय इतक्या लगेच घेईल ह्यावर विश्वास ठेवणं त्यांना काहीसं कठीण जात होतं.  पुढचे काही दिवस अगदी धामधुमीत गेले. एका २१ वर्षाच्या अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या मुलीला मुख्य राजकीय पक्षाने तिकीट देण्याची बातमी राज्यपातळीपर्यंत जाऊन पोहोचली. त्यामुळे नीलाने अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मीडियाचे बरेच लोक हजर राहिले. नशिबाने निवडणूक एक महिन्यावर होती. त्यामुळे अर्ज भरून आल्यावर नीला थेट अभ्यासात गुंतली. तिने पुन्हा एकदा अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. आठव्याचे पेपर चांगले गेले. म्हणजे अजूनही चांगले जाऊ शकले असते पण इतक्या सगळ्या व्यवधानाकडे पाहता ठीक गेले.  आणि मग मात्र तिने प्रचारात स्वतःला झोकून दिलं. पक्षाची यंत्रणा अगदी सुसज्ज होतीच आणि एका तरुण चेहऱ्याला तिकीट मिळालं म्हणून सर्व तरुणाई अगदी बेहद्द खुष होती. फेसबुक, whatsapp वरील प्रचार खुद्द नीला सांभाळत होती आणि पारंपारिक प्रचार कुलकर्णी सांभाळत असल्याचं चित्र दिसत

पुढे वाचा 
http://patil2011.blogspot.in/2015/10/blog-post.html 

1 comment:

  1. Mitra Varasdar cha punha pudhe kay zale i miss the story.

    ReplyDelete