http://patil2011.blogspot.in/2015/11/blog-post.html
पुस्तकाची कथा चांगदेव ह्या नायकाभोवती फिरते. पदव्युत्तर शिक्षण घेऊन इंग्रजी विषयाचा प्राध्यापक बनलेला चांगदेव मुंबईतील जीवनाला कंटाळून एका गावातील कॉलेजात नोकरी स्वीकारतो. ह्यात बराच आदर्शवाद असतो. आपल्या देशास स्वातंत्र्य मिळाले आहे, आपल्याकडे योग्य ते शिक्षण आहे तर मग आपण ह्या देशात कोठेही नोकरी करू शकतो हा तो आदर्शवाद! अडीचशे रुपये पगार - पगार मिळविण्यासाठी सर्व काही सहन करावी लागण्याची मनोवृत्तीअधूनमधून चांगदेवाला मनाला लागून राहत असते. पगार कितीही वाढला तरी हल्लीच्या युगातसुद्धा आपल्या सर्वांना हीच भावना सलत असते ही मात्र खरी गोष्ट!
सुरुवातीलाच ह्या आदर्शवादाला तडा देणाऱ्या घटना घडत जातात. लेक्चरच्या वेळापत्रकाची आखणी करताना पर्यवेक्षक स्वतःसाठी आणि स्त्री प्राध्यापकांसाठी सोयीच्या वेळा आखून घेतो तर चांगदेवला सकाळचे पहिली आणि सायंकाळची सर्वात शेवटची तासिका देण्यात येते. एखाद्या विषयासाठी पुस्तके लावताना सुद्धा खास ओळखीतील प्राध्यापकांची पुस्तके अभ्यासक्रमाला लावली जातात. बदमाश मुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या वर्गावरील तासिका चांगदेवला दिल्या जातात. मुलांना मार्क्स मिळायला सोपे जावे म्हणून नोट्स देण्यास चांगदेवचा तत्वतः विरोध असतो. वर्गात फारच थोडी मुले अशी असतात ज्यांना शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमात रस असतो. बाकीची सर्व मुले वर्गात प्रचंड गोंधळ करीत असतात.
http://patil2011.blogspot.in/2015/11/blog-post.html
No comments:
Post a Comment