Wednesday, March 23, 2016

Substance Vs Style

 

Substance Vs Style

ऑफिसात एका चर्चेत हा विषय निघाला. उच्चपदस्थ व्यक्तीकडे कोणती गोष्ट असणे महत्त्वाचे आहे Substance (अर्थात सखोल ज्ञान ) की Style (भुरळ घालणारे व्यक्तिमत्व). अर्थात बऱ्याच उत्तराचा ओघ दोन्ही गोष्टी असायला हव्यात असाच होता. 

हल्लीच व्यावसायिक जीवन म्हणा की वैयक्तिक जीवन! प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला अनेक कंगोरे असणं आवश्यक बनलं आहे. कारण आपल्या जीवनात ज्या ज्या लोकांशी संपर्क येतो त्या सर्वांशी चांगल्या वागणुकीची एक विशिष्ट पातळी ठेवणं आवश्यक आहे. नाहीतर होतं काय की लोक तुम्हांला तोंडावर काही बोलत नाहीत पण हळुहळू तुम्हांला ते टाळत जातात आणि मग तुम्ही मागे पडत जातात. पुर्वी असं नव्हतं. एखादा विद्वान माणुस सर्वांशी किंवा अगदी आपल्या पत्नीशी सुद्धा तुसडेपणाने वागला तरी ते खपुन जायचं किंबहुना जितका माणुस जास्त विद्वान तितका तो जास्त तऱ्हेवाईकपणे वागणार अशीच लोकांची अप्रत्यक्ष समजुत होती. 
 
http://patil2011.blogspot.in/2016/03/substance-vs-style.html 
 

Sunday, March 20, 2016

परीक्षेचे दिवस !

 
http://patil2011.blogspot.in/2016/03/blog-post_19.html 

सालाबादप्रमाणे सध्या परीक्षेचे दिवस सुरु आहेत. आणि नेहमीप्रमाणे सध्याच्या चुका लक्षात घेता पुढील वर्षी कसा सुधारित पद्धतीने अभ्यास करायचा ह्याची जोरदार चर्चा घरोघरी सुरु असेल. त्या निम्मित आजची ही पोस्ट! 
सर्वसाधारण परीक्षा देणारा विद्यार्थी विचारात घेता त्या घटनेमध्ये खालील घटक येतात.  १> ज्ञानस्त्रोत ह्यात पुस्तके आणि नोटस (वह्या) ह्यांचा समावेश होतो. पुस्तकांमध्ये परीक्षेच्या दृष्टीने १०० टक्के ज्ञान असते. नोटस मध्ये पुस्तकांतील महत्त्वाचा भाग समाविष्ट केला गेला असतो. 
साध्या परीक्षांमध्ये नोटसच्या आधारे पुर्ण गुण मिळवता येतात. पण जसजशी परीक्षांची क्लिष्टता वाढत जाते तसतसे पुर्ण गुण मिळविण्यासाठी पुस्तकांचे वाचन अपरिहार्य बनतं.    

http://patil2011.blogspot.in/2016/03/blog-post_19.html 

Tuesday, March 15, 2016

व्यापक दृष्टीकोन!

 

व्यावसायिक जीवनात एखाद्या प्रश्नाचे विश्लेषण करण्यासाठी Tops Down आणि Bottoms Up अशा दोन पद्धती अवलंबिल्या जातात. Tops Down पद्धतीत सर्वसमावेशक चित्रापासून विश्लेषणास सुरुवात करून मग हळुहळू आपण एका विशिष्ट भागापर्यंत पोहोचतो. ह्याउलट Bottoms Up ह्या पद्धतीत आपण एका विशिष्ट छोट्या भागापासुन सुरुवात करून त्या प्रश्नाच्या व्यापक भागाकडे पोहोचतो. 
हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे गेल्या आठवड्यात अंतराळात वर्षभर राहुन परतलेल्या स्कॉट केली ह्याने अंतराळातून जी प्रतिमा घेतली त्यात आशियावरील प्रदुषण अंतराळातून अगदी स्पष्टपणे दिसत असल्याचे नमुद केले आणि ते छायाचित्रसुद्धा प्रसिद्ध केले. हा झाला Tops Down दृष्टीकोन. आपल्याला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांची अशी Tops Down दृष्टीकोनातून सामोरी येणारी प्रतिमा

http://patil2011.blogspot.in/2016/03/blog-post_15.html 

Thursday, March 10, 2016

जागतिक महिला दिन!

 
 http://patil2011.blogspot.in/2016/03/blog-post.html
आज ८ मार्च - जागतिक महिला दिवस! आज सकाळपासुन ह्या संदर्भात विविध संदेश येऊ लागलेत. सर्व संदेशातील मुद्दे अगदी मान्य! घरच्या जबाबदाऱ्या सांभाळुन व्यावसायिक जबाबदाऱ्या सुद्धा यशस्वीपणे सांभाळणारी स्त्री नक्कीच कौतुकास पात्र आहे. पण ह्या सर्वांना दुसरी बाजू सुद्धा आहे.  ह्या सर्वाची सुरुवात झाली ती कार्यालयात! Diversity च्या नावाखाली स्त्रियांना कार्यालयात समान संधी उपलब्ध करून द्याव्यात असा जो उपक्रम चालवला जातो त्या बाबतीत काही स्त्री व्यवस्थापकांनी नाराजी व्यक्त केली. 

http://patil2011.blogspot.in/2016/03/blog-post.html 

Friday, March 4, 2016

Manu's Farm House Wedding!!

आमच्या लाडक्या मनुचा शुभविवाह रविवारी पार पडला. हा समारंभ अनेक बाबतीत सद्यकालीन विवाहांपेक्षा वेगळा ठरला. ह्या लग्नानिमित्त ही पोस्ट!

बऱ्याच वर्षांनी आमच्या घरी म्हणजे घरी आणि बाजुच्या वाडीमध्ये लग्नसमारंभ पार पडला. १९९३ साली आमच्या घरी कुटुंबातील ह्या आधीचे लग्न झाले होते. त्यानंतर आमच्या कुटुंबियांचा गोतावळा वाढत गेला पण मनुष्यबळ त्या प्रमाणात वाढलं नाही. त्यामुळे लग्नसमारंभ हॉलवर करण्याचे प्रमाण वाढलं. पण मनुने मात्र वाडीतच लग्न करण्याचा मानस व्यक्त केला. आम्ही सर्वांनी मनुचा हा विचार उचलून धरला. 

आमच्या समाजातील रितीप्रमाणे आदल्या दिवशी मुहुर्त, काकण वगैरे विधी शनिवारी पार पडले. ह्या आदल्या दिवशीच्या रितींना प्रामुख्याने गावातील मंडळी हजर असतात.गावातील मंडळी ही ह्या रितींच्या बाबतीत अगदी तज्ञ असतात. त्यामुळे चुकून एखाद्या रितीमध्ये आपलं काही काम आल्यास निमुटपणे त्यांचं ऐकण्यात हित असतं.

http://patil2011.blogspot.in/2016/03/manus-farm-wedding.html