http://patil2011.blogspot.in/2016/03/blog-post_19.html
सालाबादप्रमाणे सध्या परीक्षेचे दिवस सुरु आहेत. आणि नेहमीप्रमाणे सध्याच्या चुका लक्षात घेता पुढील वर्षी कसा सुधारित पद्धतीने अभ्यास करायचा ह्याची जोरदार चर्चा घरोघरी सुरु असेल. त्या निम्मित आजची ही पोस्ट!
सर्वसाधारण परीक्षा देणारा विद्यार्थी विचारात घेता त्या घटनेमध्ये खालील घटक येतात. १> ज्ञानस्त्रोत - ह्यात पुस्तके आणि नोटस (वह्या) ह्यांचा समावेश होतो. पुस्तकांमध्ये परीक्षेच्या दृष्टीने १०० टक्के ज्ञान असते. नोटस मध्ये पुस्तकांतील महत्त्वाचा भाग समाविष्ट केला गेला असतो.
साध्या परीक्षांमध्ये नोटसच्या आधारे पुर्ण गुण मिळवता येतात. पण जसजशी परीक्षांची क्लिष्टता वाढत जाते तसतसे पुर्ण गुण मिळविण्यासाठी पुस्तकांचे वाचन अपरिहार्य बनतं.
http://patil2011.blogspot.in/2016/03/blog-post_19.html
No comments:
Post a Comment