http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_20.html
आधीच्या चार पोस्ट्सना चांगला प्रतिसाद! आमच्या सहलीच्या मंडळींचा whatsapp ग्रुप. त्यातील महिला मंडळीनी प्राजक्ताने काढलेल्या फोटोसाठी वेगळी खास प्रतिक्रिया दिली. धन्यवाद मंडळी! हा whatsapp ग्रुप बराच सक्रिय आहे आणि त्यावर बरीच उदबोधक चर्चा सुरु असते.
आम्ही थकलेभागले जीव रात्री त्या हेरिटेज हॉटेलात शांतपणे झोपलो होतो. थंडी बऱ्यापैकी होती. गाढ झोपेत असताना अचानक फोनची बेल वाजली. अंधार किट्ट होता. त्यामुळे फोन नक्की कुठाय हे शोधायलाच प्राजक्ताला थोडा वेळ लागला. किरकिर वाजणारी लाकडी फरशी, रात्रभर चालु ठेवावा लागणारा गीझर ह्यामुळे काहीतरी संशयास्पद वातावरण वाटत होते.