नारदमुनी मोठ्या आशेने महाराष्ट्र देशी अवतरले खरे पण लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या सर्व निर्मात्यांनी त्यांना जवळजवळ ठुकरावूनच लावलं.
"आमचं व्यवस्थित चाललंय! सासु, सुना, सासरे, नणंद, जाऊ, दीर, प्रियकर हे घटक एका बाजूला, प्रेमळ, खाष्ट, धूर्त वगैरे स्वभावछटा दुसऱ्या बाजुला घेऊन मनाला येईल तशा व्यक्ती आणि स्वभावछटा ह्यांच्या जोड्या बनवायच्या. बेस्टचा बसस्टॉप, रिक्षावाला, ज्यूसवाला अशी पात्रं घुसवायची. त्यात उत्तर भारतीय व्यक्तिरेखा घुसावायच्या कि मग पुरुषमंडळी सुद्धा रस घेऊन पाहतात मग हे नवीन खूळ हवाय कोणाला!" एकंदरीत सर्वांच्या बोलण्याचा सारांश होता.
No comments:
Post a Comment