Wednesday, December 31, 2014

भेटीगाठी!!

 

ताम्हाणात दुधसाखरेच्या नैवेद्याची वाटी, सोबत अभिषेक केलेल्या देवांना कोरडे करण्यासाठी घेतलेल कापड आणि अंगणातल्या फुलांची परडी. अंगणात जास्वंदाची तीन चार रंगांची झाड आहेत. पावसाळ्यात ती अगदी फुलांनी बहरून जातात. पावसाळ्यातील जमिनीचा ओलावा आता संपत आला आहे. त्यामुळे ह्या झाडांची फुले ओसरू लागली आहेत. आता वडील ह्या झाडांना पाणी द्यायला सुरु करतील. तर ह्या जास्वंदाची लाल, भगवी, पिवळसर फुले आणि टगर आणि अजून एक दोन झाडांची पांढरी फुले अंगणात सकाळी फुलतात. त्यांनी परडी तशी भरते. मग ताम्हाण, फुलांनी भरलेली परडी घेऊन पूजेला लागायचं. 

पूर्ण वाचा 
http://patil2011.blogspot.in/2014/12/blog-post_31.html 
 

Friday, December 26, 2014

इंद्रायणी - ४

 

रात्रीची वेळ असल्याने इंद्रायणी आणि यमुनाबाई झोपल्या होत्या. मी घरी परतलो आहे हे कोणालाच कळता कामा नये अशी सक्त ताकीद गोपाळरावांनी सगुणाबाईंना दिली होती. त्यामुळे अर्थातच इंद्रायणी आणि यमुनाबाईंनासुद्धा ह्या गोड बातमीपासून वंचित ठेवावं लागणार होतं. गोपाळराव स्वच्छ आंघोळ करून आले. कांबळीवर झोपलेल्या आपल्या लाडक्या इंद्रायणीला पाहून त्यांना अगदी गहिवरून आलं. "तीन महिन्यात आपली छकुली किती मोठी झाली नाही?"  त्यांनी सगुणाबाईंना म्हटलं. असा थेट संवाद आपल्याशी कधी साधला असेल ह्याच्याच विचारात पडलेल्या सगुणाबाई आपल्या स्वामीकडे एकटक पाहत होत्या. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाकडे खरंतर त्यांचं लक्षही नव्हतं. पण डोळ्यातील भावातून त्यांनी ओळखलं की ते इंद्रायणीविषयीच काहीतरी कौतुकाने बोलत असावेत. मानेनेच त्यांनी त्यांना हो म्हटलं. आपल्या धन्याच्या खंगलेल्या प्रकृतीकडे पाहून त्यांचे डोळे सारखे भरून येत होते. गोपाळरावांनी न राहवून इंद्रायणीच्या कपाळावरून हात फिरवला. गाढ झोपेतल्या इंद्रायणची झोप काहीशी चाळवली गेली. तिने कूस बदलली. गोपाळराव सावधपणे मागे अंधारात गेले. आणि काही क्षणातच इंद्रायणीने डोळे उघडले. "बाबा, बाबा!" तिची चौकस नजर सर्वत्र भिरभिरत होती. "नाही ग! बाबा कोठे आहेत! तुला भास झाला असेल!" सगुणाबाईंनी प्रसंगावधान राखून दिवा विझवता विझवता तिला म्हटलं. इंद्रायणीची  समजूत काही झाली नाही. बराच वेळ ती अंधारात चाहूल घेत राहिली. "बाबा खरंच येऊन गेले, त्यांनी माझ्या डोक्यावरून हात सुद्धा फिरवला!" असंच काही वेळ पुटपुटत शेवटी ती निद्राधीन झाली. 

पुढे वाचा 
http://patil2011.blogspot.in/2014/12/blog-post_26.html  

Sunday, December 21, 2014

जन पळभर म्हणतील हाय हाय!

 
जुन्या काळच्या ह्या प्रसिद्ध ओळी! एकंदरीत जगाचे रहाटगाडे कोणाच्या जगण्यावर अवलंबून नाही, जगी जन्मलेला प्रत्येक जीव कधी ना कधी मृत्यू पावणार, आणि त्यामुळे आपल्याशिवाय कोणाचे अडून राहील असा कोणी समज करून घेऊ नये असा ह्या ओळींचा मतितार्थ! ह्या ओळींत जगाच्या स्वार्थीपणाकडे थोडासा कल झुकला असावा असा मला नेहमीच संशय येत राहिला आहे. लोकांना तुमच्याकडून केल्या जाणाऱ्या कामाशी मतलब आहे, तुमच्याशी नाही असंही कविला म्हणायचं आहे असं कधी कधी मला वाटतं. शेवटी कवी म्हणतो की अशा ह्या दुनियेच्या मोहात पडू नये आणि ईश्वराच्या आराधनेत मग्न व्हावे कारण तेच अंतिम सत्य आहे!

पुढे वाचा 

http://patil2011.blogspot.in/2014/12/blog-post_22.html 
 

Friday, December 19, 2014

इंद्रायणी - ३

 

त्या रात्रीनंतर जोशी कुटुंबाचं जीवन अगदी बदलूनच गेलं. नारायणरावांच्या बैठकीवर ब्रिटिशांनी छापा घातला खरा पण त्याची कंपूला अगदी शेवटच्या क्षणी खबर लागली आणि सर्वांनी तिथून पोबारा केला. परंतु पळताना सर्व पुरावा नष्ट करण्याची संधी मात्र त्यांना मिळाली नाही. आणि मग गोपाळरावांच्या नावाची कागदपत्रे तिथेच राहून गेली. सरकारी नोकरीत असलेल्या शिक्षकाने इंग्रजांविरुद्धच्या कटात भाग घेणं म्हणजे मोठे पातक होते. गोपाळराव रात्री येणार नाहीत असा निरोप मिळाल्यावर सगुणाबाईच्या काळजात धस्स झालं.

पुढे वाचा 

http://patil2011.blogspot.in/2014/12/blog-post_20.html 

Saturday, December 13, 2014

इंद्रायणी - २

 

सूर्य आकाशातून उतरणीला आला तशी छोटी इंद्रायणीची झोप पुरी झाली. आपल्याजवळच झोपलेल्या बाहुलीला पाहून ती हसली आणि तिची मस्त खळी पडली. काही वेळ ती तसाच घरातील आवाजाचा मागोवा घेत पडून राहिली. घरात तर सर्व शांत शांत होते. मग तिला आपल्या आईचा बागेत बोलण्याचा आवाज आला. मग एकदम उठून ती ओटीवर आली. सूर्याची अगदी कोवळी किरणे बागेतल्या झाडातून आपला मार्ग काढीत ओटीवर पसरली होती. सगुणाबाईनी काही फुले काढली होती. काही उनाडपणे पसरणाऱ्या वेलींना मार्गी लावले होते. आणि आता त्या चाफ्याच्या एका फुलाकडे लक्ष ठेऊन होत्या. ते कसे काढायचे असा त्यांना प्रश्न पडला होता. "आई!" छोट्या इंद्रायणीच्या आवाजाने त्या भानावर आल्या. मोठ्या कौतुकाने त्या तिच्याकडे पाहू लागल्या. "आई, मला पन बागेत ने ना!" इंद्रायणी म्हणाली. 

http://patil2011.blogspot.in/2014/12/blog-post_14.html 

Thursday, December 11, 2014

इंद्रायणी - १

 

"बापलेकीचा काय वार्तालाप चालू आहे?" देवघरातून आपली पूजा आटपून येणाऱ्या यमुनाताईंनी प्रेमाने विचारलं. तिला गोपाळराव उत्तर देणार इतक्यात "बाबा बाबा आपण फनचाच झाड बगायला जाऊ या का!" असं इंद्रायणीने विचारलं. आज तिचा हा हट्ट मोडण्याची गोपाळरावांची अजिबात इच्छा नव्हती. "चला जाऊयात!" पायात पुन्हा वहाणा चढवीत गोपाळराव म्हणाले. त्यांच्या वाक्य ऐकताच सगुणाबाईंनी सुटकेचा निश्वास टाकला. आता भाकऱ्या सुद्धा होणार होत्या आणि गोपाळरावांची आवडती वाल वांग्याची भाजी सुद्धा!
वाडीत  फेरफटका मारताना गोपाळराव नेहमीच प्रसन्न होत. आज इंद्रायणी सोबत असल्याने त्यांना तिची दुडकी चाल पाहण्यात अजून मजा वाटत होती. घनदाट सावलीने त्यांची वाडी व्यापली होती. वाडी नारळ, सुपाऱ्या, फणस आणि आंबे अशा झाडांनी भरगच्च भरली होती. काही वड, पिंपळाची मोठाले वृक्षही होते. गोपाळरावांच्या वाडीला लागुनच त्यांच्या चुलत्याची जमीन होती. फणसाचे झाड दिसताच इंद्रायणीच्या छोट्या पावलांची गती आपसूकच वाढली. "अग अग धावू नकोस! पडशील!" पित्याच्या मायेने गोपाळराव बोलायला आणि इंद्रायणीचा पाय अडखळून ती पडायला नेमकी गाठ पडली. तिचे कपडे मातीने माखले. इंद्रायणी तशी धीट! ती झटकन उठली. तोवर गोपाळराव तिच्याजवळ पोहोचले होते. त्यांनी तिला उचलून घेतलं आणि छातीशी कवटाळून धरलं. आता मात्र इंद्रायणीच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरु झाल्या. "अग वेडूबाई असं जरासं पडलं म्हणून काय रडायचं असतं थोडंच!"


पुढे वाचा 

http://patil2011.blogspot.in/2014/12/blog-post_12.html 

Sunday, December 7, 2014

स्व - अनुभव - फक्त दुसऱ्यांच्या नजरेतून!!

 

निसर्गतः बहुतांशी स्वकेंद्रित असलेले आपण स्वतःच्या अनुभवांची चिंता वाहण्यात इतके गर्क असतो की आपल्या अस्तित्वाने, बोलण्या चालण्याने, लिहिण्याने दुसऱ्यांना कसे अनुभव मिळतात हे बऱ्याच वेळा आपल्या खिजगणतीत सुद्धा नसते. 
काही माणसं फक्त साधी माणसं असतात. ती दैनंदिन व्यवहार करण्यापलीकडे काही करत नाहीत. एकंदरीत मनुष्यजातीच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत ह्या माणसांच्या अस्तित्वाने फरक पडला नाही असेही विद्वान म्हणू शकतात. पण ह्या साध्या माणसांची एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते आणि ती म्हणजे ह्या साध्या माणसांवर बाकीच्यांना खास लक्ष दयावे लागत नाहीत. ती भोळी भाबडी आपले नित्यक्रम सहजरीत्या पार पाडतात. 

पुढे वाचा

http://patil2011.blogspot.in/2014/12/blog-post_7.html 
 

Thursday, December 4, 2014

रम्य ते बालपण - २

 
 अण्णांना कुत्रे बाळगायचा म्हटला तर तसा शौक होता आणि म्हटली तर ती गरजसुद्धा होती. चार्ली - ब्राऊनी ही जोडी, मोती हा कुत्रा आणि राणी ही भयंकर आक्रमक कुत्री ही अण्णांनी बाळगलेल्या श्वान मंडळीतील काही उल्लेखनीय नावे! गल्लीत चार्ली - ब्राऊनीचा दरारा होता. अंगणातून मंडळी विचारत, "अहो, कुत्र्यांना बांधलं आहे का?" आणि मगच अंगणात शिरायची हिंमत दाखवीत. 

पुढे वाचा!

http://patil2011.blogspot.in/2014/12/blog-post.html