Saturday, November 29, 2014

रम्य ते बालपण - १

 
 पानवेलीची वेल बारीक कारवीच्या सहाय्याने उभी केली जात असे. दोन पानवेलीला आधार देणाऱ्या कारवीमध्ये विशिष्ट अंतर ठेवले जाई. ह्या वेलींना थेट सूर्यप्रकाशाचा मारा सहन न होत असल्याने त्या वेलींमध्ये केळी वगैरे लावण्याची प्रथा असे. ह्या वेलींची वारंवार खूप काळजी घ्यावी लागते. उंच झालेल्या आणि कारवीपलीकडे पोहोचलेल्या वेलींना खाली आणणे, त्यांच्या नाजूक खोडाला घट्ट कारवीला बांधून ठेवणे, काही काळाने नवीन वेली आणून लावणे असले कौशल्याचे प्रकार करावे लागत. ही कामे कोणी ऐरा गैरा माणूस करू शकत नसे. त्यासाठी कुशल कामगारांचा संघ लागे. ह्या कुशल कामगारांना वसईच्या भाषेत गो असे म्हणत. ह्या गो मंडळींचा खूप मान ठेवावा लागे. त्यांना सकाळी न्याहारीला होळीवरून जिलेबी, बटाटवडे आणि घरचा चहा द्यावा लागे. हा चहा एका मोठ्या तांब्यातून वाडीत पाठवला जाई आणि मग हे गो लोक केळीच्या पानातून (खोल्यातून) हा चहा पीत. ह्या गो लोकांची न्याहारी वाडीत पोहोचविण्यासाठी बहुदा आमची नेमणूक केली जात असे. ह्या वेलीमध्ये अळू, पालेभाज्या ह्यांची लागवड केली जाई.

पुढे वाचा
रम्य ते बालपण - १

Saturday, November 22, 2014

दुरावा - अंतिम भाग

 

आपल्या रुमच्या दिशेने इवा निघाली. इतक्या वर्षानंतर तिला आपल्या पहिल्या भेटीतला रूमचा क्रमांक आठवत नव्हता. पण जशी तिनं खोली उघडली तसं तिला लख्ख आठवलं. हिल स्टेशनवरील तिच्या पहिल्या भेटीतली हीच खोली होती.
"आणि हे काय, ह्या खोलीत सर्व सामान तसंच आहे! ह्या लोकांना काही समजतं की नाही!" इवा रागानेच स्वतःशीच म्हणाली.
अचानक तिची नजर खोलीतील एकमेव खुर्चीकडे गेली. आणि तिचं अंग शहारून उठलं. तिथं कोणीतरी पाठमोरं बसलं होतं. एक सेकंद भयाची भावना तिच्या मनात दाटून आली. पण दुसऱ्याच क्षणी तिनं त्या पाठमोऱ्या केसांच्या वळणाला ओळखलं. पिकले म्हणून काय झालं केसांचं ते वळण ती कधीच विसरू शकणार नव्हती.
 
पुढे वाचा!

http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_591.html 



Thursday, November 20, 2014

दुरावा - १३

 

अचानक सर्जीचा उल्लेख होताच मारियाच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. इवाच्याही ते लक्षात आले.  "तू आंद्रेईला सर्जीविषयी सांगितलं होतंस?" मारियाने अगदी आश्चर्यचकित होऊन तिला विचारलं.  "हो त्याला नाहीतरी आधीपासून सर्व माहीतच होतं आणि मी सुद्धा लग्नाआधी सगळं स्पष्ट केलं होतं!" इवा म्हणाली.  "पण मग मला कधी कधी सर्जीची आठवण यायची ते मग आंद्रेईच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं." इवा म्हणाली.  "मग कधीतरी एकदा मलाच त्याची बाजू पटली! आणि मग मीच त्याच्या  पोलंडला स्थलांतरित होण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं!" इवा म्हणाली.  "सर्जीने तुला कधी पुन्हा संपर्क नाही केला? " मारियाने अगदी केविलवाण्या आवाजात विचारलं.  "त्याने बराच प्रयत्न केला. फोनही केले! पण एकदा आंद्रेईशी लग्न करायचा निर्णय घेतल्यावर मी मात्र त्याच्याशी संपर्क ठेवणे योग्य समजलं नाही! त्याला त्याची नोकरी इतकी प्रिय होती ना! खरं प्रेम असतं तर सगळं काही सोडून तो कझानला परत नसता का आला!" इवाच्या डोळ्यात इतक्या वर्षांनी सुद्धा पाणी आलं.  "तो सगळं काही सोडून परत आला होता इवा! आणि त्याने तुला संपर्कही करायचा प्रयत्न केला होता!" हुदंके देत देत मारिया म्हणाली. 
 






पुढे वाचा 

http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_379.html 

Monday, November 17, 2014

दुरावा - १२

 

आंद्रेईची आई निघून जाताच इवा आईपाशी गेली. 
"आई, ही इतक्या सकाळ सकाळी का बरं आली होती?" इवाने विचारलं. "नाही ग, सहजच आली होती, बाकी तू निघणार किती वाजता?" तिची नजर चुकवत विषय बदलायचा आईचा प्रयत्न ती समजून चुकली. 
"आई, खरं सांग काय झालं ते!" आईचे दोन्ही हात घट्ट पकडत तिच्या नजरेत पाहत इवाने विचारलं. 
आईच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. "मी तिला सर्जीच्या घरी विचारायला सांगितलं होतं, तुझ्यासाठी!"
"काय!" इवा मोठ्याने ओरडली!
"तुम्हांला, हे सुचतं तरी कसं आणि ते सुद्धा मला न  विचारता!" आपली आई असं काही करू शकते ह्याच्यावर विश्वास न बसलेली इवा अजूनही ओरडत होती. 

पुढे वाचा 

http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_3.html 

Thursday, November 13, 2014

दुरावा - ११

 

"ही इवा कोण? ग्रेगरीकडे भेटलेली तुझी मैत्रीण, तीच का?" विवियनने मुद्दामच खोचक प्रश्न केला. 
"हो तीच! आणि जी दुसऱ्या दिवशी आपल्या घरी आली होती तीच " आपल्या वडिलांचा स्वभाव पूर्णपणे माहित असलेला सर्जी म्हणाला.
 "हं!" विवियन ह्यांनी एक सुस्कारा टाकला. "तिचं करियर मला काही खास दिसलं नाही! साध्याच कंपनीत काम करत होती आपल्याला भेटली तेव्हा!" विवियन ह्यांनी आपल्या मनातलं बोलून दाखवलं. 
"मला तिच्या करियरशी काही देणं घेणं नाहीये! मला ती आवडते, मी तिच्याशी लग्न करणार!" सर्जी म्हणाला. 
"सर्जी, तू थोडी व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावास असं मला वाटत! एखाद्या चांगल्या करियर करणाऱ्या मुलीशी तू लग्न केलंस तर ती आयुष्यभर तुला बौद्धिकदृष्ट्या अधिक चांगली साथ देऊ शकेल!" विवियनने आपलं घोडं पुढे दामटण चालूच ठेवलं. 
"हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यात तुम्ही दखल देऊ नयेत असं मला वाटतं!" संयम संपलेल्या सर्जीने शेवटचा घाव घातला. 
"ठीक आहे!" असं म्हणत विवियनने फोन ठेवला. 


पूर्ण भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_548.html 

Sunday, November 9, 2014

Happy New Book Reading

 

 पुन्हा एक शाहरुख खानचा चित्रपट आणि पुन्हा एकदा शंभर दोनशे कोटीचे आकडे!! जया बच्चनने अगदी तारतम्य नसलेला चित्रपट म्हणून ज्याची बोळवण केली त्याने सुद्धा दोनशे कोटीचा आकडा गाठावा? माझ्या सुदैवाने ह्या चित्रपटाची तिकिटे आम्हांला मिळाली नव्हती, परंतु ज्याने ज्याने हा चित्रपट पाहिला त्याने त्याने "तू वाचलास" म्हणून मला नशीबवान असे संबोधले. मध्येच मला ह्या आकड्यांच्या खरेपणाविषयी शंका यायची. हल्ली ही शंका सुद्धा घेणे मी सोडून दिले आहे. पण इतके लोक असा चित्रपट पाहतातच कसे? असा प्रश्न तरी मला पडतोच. मग मी मला वाटलेलं एक जुनंच उत्तर मी स्वतःला देतो. "लोकांना घरी शांतपणे बसता येत नाही!"

पुढे वाचा
http://patil2011.blogspot.in/2014/11/happy-new-book-reading.html 

Saturday, November 8, 2014

ब्लॉग पोस्टचे वर्गीकरण!!

 
आज सवडीने विविध ब्लॉग पोस्टचे वर्गीकरण करत बसलो होतो.  वर्गीकरणाचे गट आणि त्यातील पोस्ट्स खालीलप्रमाणे

१> आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवरील पोस्ट्स - अवती भोवती ह्या शीर्षकाखाली



अवती भोवती
टूर फ्रांस, ऑलिम्पिक, रसिकता वगैरे वगैरे 
ऑलिम्पिक २०१२ एक आढावा
सावळा गोंधळ
दिल्लीतील दुर्देवी घटना 
अर्जुनाची निवड.
जिद्दी लढवय्या सौमिक चटर्जी
मुंबई पुणे एक्स्प्रेस महामार्ग अपघात
इराणी चषक सामना - रोहित शर्मा, अभिषेक नायर आणि सचिन!
इकडे आड तिकडे विहीर आणि इटलीचे खलाशी
आत्मक्लेश
जिया खान आणि बालवयातील प्रसिद्धी / यश
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार / फेररचना
नामवंत, सचिन आणि राज्यसभा
कांदा, पेट्रोल, चेन्नई एक्स्प्रेस आणि टक्केवारी!
महाविद्यालयीन आवार मुलाखत (कॅम्पस इंटरव्यू)
पृथ्वीचा आयुष्यकाल
सूर्याच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांचे परस्पर रूपांतरण!
अमिताभ आणि रेखाचा एकत्र हवाईप्रवास - एक कल्पनाविलास!
सचिनच्या निवृत्तीसोहळ्याचे इतर परिणाम (Side Effects)!
कलम ३७७
परीक्षामय
बोलघेवड्या मोटारगाड्या !


माझ्या जीवनातील आठवणी - आत्मचरित्र ह्या शीर्षकाखाली

  न्यू इंग्लिश स्कूल वसई- शालेय जीवनातील आठवणी
 आनंदठेवा
  फ्लोरिडातील आक्रमक पक्षी ते बोरिवलीतील चिमणी घरटे
  क्रिकेट आणि मी
  आमच्या बँचचे स्नेहसंमेलन
  महाविद्यालयीन आवार मुलाखत (कॅम्पस इंटरव्यू)
  IT मधल्या रात्रपाळ्या
  दिवाळीचे दिवस!
  I MISS YOU पांगारा!

मी वसईसारख्या गावातला,   त्यामुळे जीवनविषयक फंडे द्यायची सवय जन्मजात! फरक इतकाच की पूर्वी लोक फंडे नाक्यावर द्यायचे मी ब्लॉगवर देतो. असे हे फंडे - जीवनज्ञान ह्या शीर्षकाखाली
 निरागसतेचा लोप
http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_748.html
 क्षण ओळखावा क्षण अनुभवावा !! http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_420.html
 Level1, Level2... http://patil2011.blogspot.in/2014/11/level1-level2.html
 ग्यान, गलका, शिराळा, कसाब http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_837.html
 शक्तिमान विरुद्ध बुद्धीजीवी http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_979.html
 जगी सर्व सुखी असा कोण आहे? http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_922.html
 हल्लाबोल http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_543.html
 रिकामी न्हावी... http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_982.html
 दोन नियम http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_384.html

खेळ गृहितकांचा
संवाद कला
सरलता
शीर्षक नाही!
आनंदठेवा!
  Informed Decision - माहिती उपलब्ध करून घेतलेला निर्णय
  नरसिंह राव ते मिकी आर्थर आणि NO DECISION IS A DECISION!!
  ज्ञानग्रहण आणि अभिव्यक्ती
  अभिमन्यु सारे
  आयुष्यावर बोलू काही!
  Empathy


  वेळेचा सदुपयोग करण्याचे काही मार्ग!
  संयमी प्रतिक्रिया!






मराठी कथा - काही पूर्ण तर काही अपूर्ण! अपूर्ण कथा काही दिवसात नक्की पूर्ण करणार!


आभास - एक काल्पनिक जग!!
जाणता अजाणता - एक मनोद्वंद
सुमेर ग्रह - एक अदभूत जग
पट मांडला - एक राजकीय कथा! 
भेदी  (अपूर्ण)
तपोवन (अपूर्ण)
दुरावा (अपूर्ण)

पुन्हा (अपूर्ण)

क्रचलका (अपूर्ण)

थरार 
 लिंक देणे आहे 


माझं मन जुन्या काळात बऱ्याच वेळा गुंतत राहते. अशा वेळी होणारी जुन्या आणि नवीन काळची अपरिहार्य तुलना जुना काळ - नवा काळ ह्या शीर्षकाखाली

बदलांचा मागोवा!
FM ते मुंबई ब
भावनिक सुसंवाद
मॉल, पिझ्झा, IPL आणि उंचावलेली जीवनशैली 
या सुखांनो या!
क्षणभंगुर ते शाश्वत
सकाळचा चहा आणि शब्दांच्या पलीकडलं ! 
एक खंत!
गेले ते दिन गेले!
फेसबुक, Whatsapp आणि एकाग्रता
दोष ना कुणाचा!
 Cool… अनुकूल की प्रतिकूल !
 सत्यनारायणाच्या पूजेचे आधुनिक व्रत!
 दिवाळीचे दिवस!


अजून काही प्रकारात सर्व पोस्ट्सचे वर्गीकरणकेले आहे. ही पोस्ट त्या वर्गीकरणाच्या माहितीने मी काही दिवसात अपडेट करीन. तेव्हा काही दिवसांनी पुन्हा ह्या पोस्टला भेट दया! किंवा ह्या नवीन ब्लॉगवरील लेबलवर क्लिक करा.