अचानक सर्जीचा उल्लेख होताच मारियाच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. इवाच्याही ते लक्षात आले. "तू आंद्रेईला सर्जीविषयी सांगितलं होतंस?" मारियाने अगदी आश्चर्यचकित होऊन तिला विचारलं. "हो त्याला नाहीतरी आधीपासून सर्व माहीतच होतं आणि मी सुद्धा लग्नाआधी सगळं स्पष्ट केलं होतं!" इवा म्हणाली. "पण मग मला कधी कधी सर्जीची आठवण यायची ते मग आंद्रेईच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं." इवा म्हणाली. "मग कधीतरी एकदा मलाच त्याची बाजू पटली! आणि मग मीच त्याच्या पोलंडला स्थलांतरित होण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं!" इवा म्हणाली. "सर्जीने तुला कधी पुन्हा संपर्क नाही केला? " मारियाने अगदी केविलवाण्या आवाजात विचारलं. "त्याने बराच प्रयत्न केला. फोनही केले! पण एकदा आंद्रेईशी लग्न करायचा निर्णय घेतल्यावर मी मात्र त्याच्याशी संपर्क ठेवणे योग्य समजलं नाही! त्याला त्याची नोकरी इतकी प्रिय होती ना! खरं प्रेम असतं तर सगळं काही सोडून तो कझानला परत नसता का आला!" इवाच्या डोळ्यात इतक्या वर्षांनी सुद्धा पाणी आलं. "तो सगळं काही सोडून परत आला होता इवा! आणि त्याने तुला संपर्कही करायचा प्रयत्न केला होता!" हुदंके देत देत मारिया म्हणाली.
पुढे वाचा
http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_379.html
No comments:
Post a Comment