Monday, April 27, 2015

जीवनगाणे!

 

  जीवनगाणे!

 मोठं होत असताना शाळेत तर शिकण्याची प्रक्रिया चालूच होती पण प्रत्यक्ष जीवनातसुद्धा अधूनमधून जाणवायचं की अरे हे तर नवीनच काहीतरी आज शिकायला मिळालं. त्यावेळी पूर्ण जगाकडे पाहण्यासाठी उपलब्ध असलेली खिडकी फारच किलकिलती उघडल्यामुळे बाह्य जगताचा म्हटलं तर मर्यादित भाग दृष्टीस पडायचा. आजच जरी मी मोठा  तत्त्वज्ञ बनण्याचा आव आणून ह्या पोस्ट्स टाकत असलो तरी अजूनही जगाचा अगदी अगदी मर्यादित भाग मी प्रत्यक्ष पाहिला / अनुभवला आहे. आपल्या मातापिता, पत्नी आणि तान्हुल्याला गावी मागे सोडून सीमारेषेवर शत्रूशी लढावयास आलेला सैनिक शत्रूशी लढताना जेव्हा आपल्या सर्व साथीदारांपासून एकटा पडतो आणि शत्रू त्याला घेरतो त्यावेळी त्याच्या मनात येणाऱ्या भावनांची व्याप्ती मला समजू शकते असे विधान मी इथं सुखात बसून करू नये. मनाची कल्पनाशक्ती इतकी प्रगल्भ असू शकते का ज्यामुळे एखादा प्रसंग प्रत्यक्ष न अनुभवता सुद्धा त्यातील भावनांची अनुभूती तो घेऊ शकतो. 

जीवनगाणे!  

No comments:

Post a Comment