स्नेहसंमेलन गाथा !!
२००९ साली आम्ही आमच्या आवडत्या शिक्षकांचा गौरव करण्याचं आम्ही ठरविलं. त्यावेळी साधारणतः आम्ही ४० -४५ आणि जवळपास ४० गुरुजन ह्यांच्या सोबतीनं एक हृदयस्पर्शी सोहळा झाला.
का कोणास ठाऊक, पण २०१० सालापासुन मात्र स्नेहसंमेलनास हजर राहणाऱ्या आमच्या सहविद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची घट होत गेली. आणि सध्या ही संख्या साधारणतः वीसच्या आसपास स्थिरावली आहे. आज २६ जानेवारी २०१६. आमच्या बॅचचे २६ किंवा २५ जानेवारीस होणारं सलग ९ वे स्नेहसंमेलन! बाजुच्याच वर्गात १९८३ बॅचने सुद्धा आज स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं. तिथं जवळपास ७० जण उपस्थित होते आणि वर्ग अगदी गजबजून गेला होता.
No comments:
Post a Comment