Valentine दिवस !
जमाना बदलला. तरुणाईसोबत ज्यांचे लौकिकार्थाने प्रेम करण्याचे दिवस सरले असे लोक सुद्धा ह्या कल्लोळात सामील होऊ लागले. हे विधान स्फोटक आहे. प्रेम करण्याचे दिवस कधीच सरत नाहीत असं मानणाऱ्या सदाहरित लोकांचा जमाना आहे हा! मोठा सखोल विषय आहे हा! प्रेम म्हणजे नक्की काय असतं ह्यावर मोठमोठ्या दिग्गजांनी विश्लेषण केलं आहे.
पूर्वीच्या काळातील काही प्रेमं तशी अव्यक्तच राहिली. कधी ते कोणाच्या हास्यावर फिदा झाल्याने झालेलं ते प्रेम होतं , तर कधी कोणाचे डोळे आवडल्याने झालेलं ते प्रेम होतं. ते वयच असं होतं की आपलं कोणीतरी असावं अशी भावना प्रबळ झालेली असते. दोघं दुर गेले ते परत न भेटण्यासाठी आणि एकमेकांची त्या वयातील प्रतिमा, रम्य आठवणी कायम ठेऊन! आयुष्याच्या सायंकाळी सुद्धा डोळ्यात दोन आसवं आणण्याची क्षमता देणारं हे प्रेम होतं. हे अव्यक्त प्रेम असंच राहून देण्यातच जी गहराई आहे ती कशात नाही!
No comments:
Post a Comment