विषमज्वरामुळे मी गेले काही दिवस Blog लिहू शकलो नाही. शालेय जीवनात म्हण असे 'पडू आजारी मौज ही वाटे भारी! परंतु नोकरीच्या कालावधीत मात्र तसे नसते. प्रत्येक सुट्टीचा दिवस हा आपल्या कामाचा बोजा वाढवीत असतो. परंतु काही दिवसानंतर मात्र आपण निर्वाणा स्थितीत पोहचतो. कामाचे विचार नाहीसे होतात आणि फक्त वेळ कसा काढायचा याची चिंता उरते! सकाळी वर्तमानपत्रे, दुपारी झोप आणि संद्याकाळी IPL असा दिनक्रम ठरतो. ललित मोदीने दररोज ipl चे दोन दोन सामने का ठेवले नाहीत असे प्रश्न मला पडतात
NCL चे सामने मात्र मी गेले दोन रविवार खेळू शकलो नाही. NCL मध्ये आता २००६ आणि २०१० च्या batch चे विद्यार्थी सहभागी होऊ लागले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे!
बघता बघता तब्येत सुधारते आणि कार्यालयात परतण्याचा दिवस जवळ येतो! मन होते थोडे दुखी कारण संपलेला असतो आराम ! लक्ष्य असते ते येणाऱ्या दीर्घ साप्तहिक सुट्टीकडे आणि IPL / NCL सामन्याकडे!
No comments:
Post a Comment