मी पुढील सिद्धांत कुठे वाचला ते नक्की आठवत नाही, परंतु मला तो फार आवडतो. एका Ph.D झालेल्या विद्यार्थ्याची विविध स्थितीमधील मनोभूमिका त्यात विषद केली आहे.
दहावी पास - मला जगातील सर्व गोष्टी कळल्या आहेत
बारावी पास - मला जगातील ९०% गोष्टी कळल्या आहेत
पदवीधर - मला जगातील खूप गोष्टी कळल्या नाहीत
मास्टर्स DEGREE - मला जगातील खूप गोष्टी कळल्या नाहीत आणि विद्वानांना देखील काही गोष्टी कळल्या नाहीत
Ph.D - मला काहीच कळले नाही आणि विद्वानांना देखील खूप गोष्टी कळल्या नाहीत
या सिद्धान्ताबरोबर हे देखील मजेशीर आहे. जगात ४ प्रकारची माणसे आहेत
प्रकार १ - या माणसाना बरेच ज्ञान असते आणि आपल्याकडे जे ज्ञान आहे त्याची त्यांना माहिती असते
प्रकार २ - या माणसाना बरेच ज्ञान असते पण आपल्याकडे जे ज्ञान आहे त्याची त्यांना माहिती नसते
प्रकार ३ - या माणसाना खूप कमी ज्ञान असते पण आपल्या अज्ञानाची त्यांना माहिती नसते
प्रकार ४ - या माणसाना खूप कमी ज्ञान असते पण आपल्या अज्ञानाची त्यांना माहिती असते
व्यावसायिक जगात काम करताना मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे विविध प्रसंगी आपणास या ४ प्रकारातील एक प्रकार अंगीकारावा लागतो. त्याविषयी विस्ताराने पुढील ब्लॉग मध्ये !
No comments:
Post a Comment