आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!
1> तुझा ब्लॉग वाचला. वाचून गम्मत वाटली. पण गमतीचा भाग सोडला आणि थोडा गंभीरपणे विचार केला तर तुलाही काही गोष्टी जाणवतील. समाजात कायमस्वरूपी बदल घडवणे कोणत्याही हुकुमशाहाला शक्य झाले नाही हा इतिहास आहे. मुळातच बदल एका रात्रीत घडत नाही त्यासाठी खूप चिकाटी, संयम आणि सातत्याने केलेले प्रयत्न यांची गरज असते. जबरदस्तीने कोणत्याही गोष्टीची केलेली अंमलबजावणी नेहमीच अल्पायुषी ठरते म्हणूनच संतानी सांगितलेल्या विधायक मार्गावरून वाटचाल करणे केव्हाही श्रेयस्कर. आपल्यासारख्या सुशिक्षित आणि संवेदनशील माणसांनी आपल्या घरातच चांगले बदल घडवून आणून त्याची सुरुवात करावी. इच्छाशक्ती आणि संघटना ह्यांच्या जोरावर ते सहज शक्य आहे. शांततेचा हा मार्ग खडतर आहे पण समाजावर होणारे त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतील. हा मार्ग चोखाळताना एक मात्र निश्चित लक्षात ठेवले पाहिजे ते म्हणजे संतांची शिकवण आणि आताच्या काळातील व्यवहारीपणा यांची उत्तमरीत्या सांगड घालणे.
2> या हुकुम शाहीची भारताला अत्यंत गरज आहे आणि माझा पूर्ण पाठींबा ( तुला किव्हा तुझा सादर ( Proposed) हुकुमशहा साठी
3> Incidentally, communism was supposed to be dictatorship of proletariat and supposed to have benevolent motive.
However dictatorship comes for and with power. And power and corruption are almost synonyms.
No comments:
Post a Comment