Sunday, August 15, 2010

ब्लॉग कशासाठी ?

आपण अथवा मी ब्लॉग का लिहितो? सुरुवातीला ब्लोग हे आपल्या बैचच्या विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवण्याचे साधन म्हणून मी सुरुवात केली. त्यानंतर आजूबाजूच्या समाजावर भाष्य करण्याचे उत्तम साधन म्हणून मी ब्लॉग कडे पाहिले, भूतकाळाला उजाळा देत काही आठवणी लिहिल्या. अजून तात्कालिक घटनांवर भाष्य करण्यासाठी काही अपवाद वगळता (Best Of Five) हे माध्यम मी वापरले नाही. अचानक आज मला जाणीव झाली की हे सर्व ब्लॉग लिहिले गेले आहेत सुशिक्षित मध्यमवर्गीय दृष्टीकोनातून, सुशिक्षित मध्यमवर्गीय वाचकवर्गाला डोळ्यासमोर ठेवून. समजा एखादा गरीब शेतकरी, कुख्यात डाकू, भष्ट्राचारी राजकारणी किंवा गर्भश्रीमंत उद्योगपती हे ब्लॉग वाचता झाला तर त्याला काही फरक पडेल का? (तसा फरक आपल्याला सुद्धा पडत नाही). त्या माणसाच्या संवेदना क्षणभर तरी जागृत होतील का? उत्तर स्पष्ट पणे नाही असे आहे.

समजा एखाद्याला हे ब्लॉग समाज परिवर्तनाचे साधन म्हणून वापरायचे झाले तर सर्व समाज सुशिक्षित आणि संवेदना जागृत असलेला हवा. परंतु दुर्देवाने तशी परिस्थिती नाही. मग असा समाज बदलायचा तरी कसा? माझ्या मनात सुप्त इच्छा आहे एक तर मी हुकुमशाह व्हावे किंवा या देशाला कोणी तरी एक हुकुमशाह मिळावा.

आता मी हुकुमशाह झालो तर काय करीन?
लोकसंखेवर आळा घालण्यासाठी जोरदार प्रयत्न करीन अगदी संजय गांधीने केले तसे!
सर्व राजकारणी लोकांच्या मागे आयकर खात्याला लावीन.
भारताच्या दुर्गम / ओसाड भागात नवीन सुयोजित शहरे उभारीन. प्रत्येक कंपनीस तिच्या आकारमानानुसार ह्या नवीन शहरांत आपली कार्यालये उभारण्यासाठी भाग पाडीन. ह्या शहरांभोवती दाट जंगले उभारण्यासाठी बेकार लोकांना बोलावीन.
आधीच्या एका ब्लॉग मध्ये लिहिल्याप्रमाणे (कृषिक्षेत्र) शेतीकडे एक उद्योग म्हणून बघीन.
आणि ...










माझ्याविरुद्ध ब्लोग लिहिणाऱ्या व्यक्तीस तुरुंगात टाकीन!

No comments:

Post a Comment