Wednesday, October 9, 2013

सूर्याच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवांचे परस्पर रूपांतरण!



 
पहिल्यांदा ही बातमी वाचली त्यावेळी मला एकदम आश्चर्य वाटलं. परंतु खोलात जावून बातमी वाचल्यावर बऱ्याच गोष्टी कळल्या. दर ११ वर्षांनी होणारी ही घटना. सूर्याच्या ध्रुवांची चुंबकीय शक्ती कमजोर होत जात जात शून्यावर पोहोचते आणि पुन्हा मग धीम्या गतीने विरुद्ध ध्रुवाच्या स्वरुपात अस्तित्वात येते. हे रूपांतरण होत असताना 'Current Sheet' नावाचा सूर्याच्या विषुववृत्तावरून बिलियन किमी अंतरापर्यंत प्रसरण पावणारा पृष्ठभाग (बहुदा वायुमय अथवा किरणोत्सर्गी असणारा) बराचसा अशांत बनतो. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असताना ह्या पृष्ठभागाच्या लाटांच्या आतबाहेर जात असते. ह्या पृष्ठभागाच्या शांत स्थितीतून अशांत स्थितीत होणाऱ्या परिवर्तनाच्या कालावधीत अंतराळात वादळी वातावरण निर्माण होऊ शकते असे नासाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 
हे ध्रुवाचे रूपांतरण  वैश्विक किरणांपासून अधिक सुरक्षाकवच देते.  हे उच्च ऊर्जामय कण आपल्या अंतराळात जवळ जवळ प्रकाशाच्या वेगाने प्रवास करीत असतात आणि ते अंतराळवीर आणि उपग्रह ह्यांना हानिकारक ठरू शकतात.  आणि हा चूरघळलेला पृष्ठभाग आपले ह्या उच्च उर्जामय कणांपासून रक्षण करतो. खरे सांगायचे झाले तर हा भाग काही मला झेपला नाही!
ह्या चूरघळलेल्या पृष्ठभागाचे परिणाम सूर्यमालेत दूरवर पोहोचतात, अगदी प्लुटोच्या पलीकडे आणि वोयेजर यान जिथवर गेलेय तिथपर्यंत सुद्धा! उत्तर ध्रुवाने आपले चिन्ह आधीच बदलले आहे आणि दक्षिण ध्रुवाची चिन्ह बदलण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याची धावपळ सुरु आहे. ह्या सर्व प्रक्रियेत सूर्यावर आढळून येणारे डाग नेहमीपेक्षा कमी आहेत. 
बघा म्हणजे किती मोठा बदल घडून येत आहे आणि कौतुक नासाचे की ते ह्या सर्व घडामोडीची नोंद ठेवतात.
 
ही सर्व माहिती http://www.space.com/22271-sun-magnetic-field-flip.html ह्या संकेतस्थळावरून भाषांतरित केली आहे. 
 
बघा म्हणजे किती मोठा बदल घडून येत आहे आणि कौतुक नासाचे की ते ह्या सर्व घडामोडीची नोंद ठेवतात.
 
आदित्याचा उपदेश - छोट्या छोट्या  गोष्टींची चिंता सोडून द्या! विश्वात बऱ्याच घडामोडी घडत असतात, आपले काम करा आणि शांत झोप घ्या!
 

No comments:

Post a Comment