Thursday, April 1, 2010

More Fundas - Warning heavy dose

कार्यालयात काम करताना आपण या चार प्रकारातून सतत फिरत राहिले पाहिजे. समजा आपणास एखादे presentation द्यायचे आहे त्यावेळी प्रकार ३ च्या माणसाच्या मनोभूमिकेत शिरा. आपल्या अज्ञानाविषयी अजाणतेपण स्वीकारा. आपणास सर्व काही माहिती आहे असे समजून श्रोतेवर्गाला सामोरे जा. परीक्षा देताना सुद्धा प्रकार ३ स्वीकारा. आपणास जे माहित आहे त्याविषयीच परीक्षेआधी विचार करा.
समजा आपल्या वरीष्टाबरोबर एखाद्या गंभीर समस्येविषयी मूळ कारण शोधण्याची (root cause analysis ) बैठक सुरु आहे. त्यावेळी मात्र आपणास प्रकार १ स्वीकारावा लागेल. थोडक्यात सांगायचे झाले तर जोपर्यंत आपणाकडे असलेल्या ज्ञान - अज्ञान विषयी आपणास जाणीव आहे तोपर्यंत सर्व काही आपण निभाऊन नेऊ शकतो.
अभियांत्रिकीची परीक्षा ही एक मोठी कसोटी असते. तुम्ही कितीही scholar असा किंवा तुम्ही कितीही अभ्यास केलेला असो, प्रत्येक विषयामध्ये पास होणे हे प्रथम उदिष्ट असते. ४ तासाच्या परीक्षेत पहिले २ - २ १/२ तास हे केवळ ४० गुण मिळवून ठेवण्यासाठी राखून ठेवावे लागतात. आणि त्यासाठी तुम्ही प्रथम कोणते प्रश्न निवडता हे फार महत्वाचे ठरते. ह्या कालावधीमध्ये आपला आत्मविश्वास शाबूत राखणे हे महत्वाचे काम तुम्हाला बजावावे लागते. जर तुमचा आत्मविश्वास २ तासानंतर शाबूत असेल तर तुम्ही अर्ध्याहून अधिक लढाई जिंकलेली असते त्यानंतरचा राहिलेला वेळ हा तुम्ही राहिलेल्या प्रश्नांसाठी देऊ शकता. हे प्रश्न असे असतात जे तुम्ही बहुधा प्रथमच सोडवीत असता परंतु जर त्या क्षणी तुम्ही स्वतःविषयी चांगले वाटून घेत असाल तर तुम्ही या अपरिचित प्रश्नांना सहजतेने सामोरे जाऊ शकता.
आजच्या जगात खूप वेळा ही परिस्थिती आपणासमोर येते. आपल्या स्वतःलाच आपणास motivate करण्याची गरज असते. आणि लक्षात ठेवा आजच्या युगात जो कोणी स्वतःला सदैव motivate (उत्साहित) ठेवू शकतो तोच या युगात टिकू शकतो. व्यक्ती एकच आहे पण ती स्वतःच्या ९०% क्षमतेने काम करू शकते की ३०% क्षमतेने यावरच तिचे यश अवलंबून आहे

No comments:

Post a Comment