दर्शनने passion अर्थात झपाटल्याची भावना यावर उत्तम blog लिहिला. त्याने काही अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. जीवन सुंदर बनविण्याचे passion हवे. छोट्याशा अपयशाने खचून जाता कामा नये, आपणाजवळ एक vision हवे, आपण कोणत्या गोष्टी बदलू शकत नाही याची जाण हवी आणि हे सत्य स्वीकारायची तयारी हवी.
आजकाल आपल्यापैकी बर्याच जणांना एका मानसिक संघर्षातून जावे लागत आहे. लहानपणाची शिकवण आणि त्याच्याशी पूर्ण विसंगत आजकालची बाह्य परिस्थिती. परंतु यातील बदलणार तरी कोणत्या गोष्टी, सुरुवात करायची कोठून? या प्रश्नांनी भांबावून जावून बर्याच वेळा आपण याविषयी विचार करायचेच सोडून देतो आणि मग प्रत्यक्ष कृती तर फारच दूरची गोष्ट. दर्शनने मांडलेल्या विचारानुसार आपण स्वतःशीच एक लक्ष्य निश्चित करा. मी एक उदाहरण देतो. समाजात नितीमत्ता ढासळते आहे, लोक दुसर्यांचा उपदेश ऐकण्याच्या पलीकडे गेले आहेत. ठीक आहे, मग आपल्या घरापासून सुरुवात करा. घरातील परिस्थितीचा ताबा घ्या. छोट्या छोट्या यशातून मोठी स्वप्ने साकारता येतात.
हीच गोष्ट लागू होईल ती तुमच्या छंदाला, एखादी नवीन कला, भाषा शिकायच्या स्वप्नाला! जर तुमच्या कडे passion असेल तर नक्कीच तुम्ही बरेच काही साधू शकता. पहिली पायरी आहे ती स्वतःचे passion काय आहे ते ओळखण्याची! तर मग सुरुवात करणार ना आजपासून?
No comments:
Post a Comment