Sunday, June 6, 2010
साक्षीदार की भागीदार
मध्येच एक वाक्य कानावर पडले, नियोजन करण्यात अपयशी ठरणे म्हणजेच अपयशासाठी नियोजन करणे. Failing to Plan mean Planning to fail. आज हेच वाक्य मी पुढील २० वर्षासाठी वापरतो आहे. या आधीसुद्धा मी या विषयावर लिहिले होते. गेल्या २० वर्षांत प्रचंड बदल झाले हे मान्य! पण पुढील २० वर्षांत सुद्धा याच वेगाने किंबहुना त्याहून अधिक वेगाने बदल होणार आहेत. त्यात आपली भूमिका काय असणार आहे याविषयी प्रत्येकाने विचार करणे आवश्यक आहे. यातील बरेचसे बदल आपल्या मुलांवर परिणाम करतील. आपली मुले पुढील २० वर्षात कशी वाढली पाहिजेत याविषयी आपले नियोजन काय आहे? की जशी ती वाढतील तशी वाद्धून द्यावीत अशी आपली भूमिका आहे? नियोजन करणे ही तर केवळ पहिली पायरी आहे, नियोजन केलेल्या आराखड्याची अंमलबजावणी करणे ही तर त्याहून कठीण गोष्ट. पण सुरुवात तर केलीच पाहिजे. आपली पुढील पिढी, आपल्या बाजूचा समाज पुढील २० वर्षांत कसा असायला हवा याविषयी तुमचे विचार कागदावर मांडा. आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी आपल्या घरापासून सुरुवात करा. नाहीतर २० वर्षांनी आपल्या बाजूला सामाजिक जीवनाच्या बाबतीत अमेरिका झालेला दिसेल आणि आपण त्याचे केवळ साक्षीदार झालो याची खंत आपणास राहील
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment