दहावीच्या वेळची गोष्ट! मी फडके सरांकडे शिकवणीसाठी जात असे. मराठी निबंधासाठी त्यांनी माझ्याकडून 'भग्न देवालयाचे आत्मवृत्त' हा एक उदाहरण म्हणून निबंध तयार करून घेतला होता. विचार असा होता की कोणताही आत्मवृत्ताचा निबंध आला की या निबंधांत योग्य ते बदल करून तो निबंध लिहायचा. योगायोगाची गोष्ट अशी की दहावीच्या परीक्षेत 'भग्न देवालयाचे आत्मवृत्त' हाच विषय निबंधासाठी आला. तयार केलेला निबंध जसाच्या तसा लिहायला मला मात्र कसेसेच वाटले. आज मला ही गोष्ट आठवायचे कारण मात्र दुसरेच आहे, आजच्या युगात आपण भग्न हा शब्द जवळ जवळ विसरून गेलो आहोत. आपण कोणत्याही वास्तूला भग्न होण्याची संधीच देत नाही. Redevelopment च्या नावाखाली आपले बांधकाम व्यावासायीकमित्र एखादी वास्तू थोडी जुनी झाली की तिच्या जागी नवीन वास्तू उभारून मोकळे होतात. कालाय तस्मे नमः ! मूळच्या वास्तूंचा आत्मा असेल काय आणि असल्यास त्याचे काय होत असेल याचा विचार करण्यास आपणास वेळ आहे कोठे?
आज मी विषयांतर करायच्या मूडमध्ये आहे. वास्तूच्या आत्म्याकडून मी आपले मृत्युनंतर काय होत असेल या विषयाकडे वळतोय. मला मृत्यू ही संकल्पना आवडत नाही. प्रत्येक माणूस हा एक मोठी गाथा आहे. इतक्या वर्षात प्रत्येकाला किती अनुभव येतात, माणूस किती अनुभवसमृद्ध बनतो आणि हे सारे काही एका क्षणात नाहीसे होणार, हा विचारच मला आवडत नाही . तरीपण आपण तार्कीकदृष्ट्या मृत्युनंतर आपले काय होत असेल या विषयीच्या पर्यायानच विचार karuya
सर्व काही संपते. १९४० साली आपण नव्हतो आणि २०८० साली आपण नसणार. या विचारानुसार आत्मा हा प्रकार अस्तित्वात नाही.
आपण हे एका मोठ्या आत्म्याचे (अनंत) भाग आहोत. या मोठ्या आत्म्याचा काही अंश प्रत्येक जीवात टाकला जातो आणि आपण आपल्या भूतलावरील वास्तव्यात या आत्म्याला घेवून वावरतो. मृत्युनंतर हा अंश परत मूळच्या मोठ्या आत्म्यात (अनंतात) विलीन होतो.या विचारानुसार पुर्नजन्म शक्य आहे. परंतु परत येताना मात्र आपणास आत्मा म्हणून अनंताचा कोणताही हिस्सा परत मिळू शकतो. आता हा हिस्सा मागच्या जन्मीच्या हिस्स्यापेक्षा वेगळा असण्याची शक्यताच जास्त असते. परंतु जर हा हिस्सा मागील जन्मापेक्षा वेगळा नसेल तर मग मात्र आपणास मागच्या जन्मातील काही भाग आठवू शकतो
पर्याय दोन पुढे नेवून, आपण किती वेळा या मृत्यू - जन्माच्या फेर्यात अडकणार आहोत हे मात्र कोण ठरवणार? आपणास मिळालेला अनंताचा भाग (आत्मा) आपण किती corrupt करतो यावर ते अवलंबून असणार. ही संकल्पना पाप पुण्याशी निगडीत झाली
प्रश्न आहे कि हे सर्व कोणी संरचीले? जो कोणी या विश्वाचा निर्माता आहे तो तरी सर्व जाणून आहे काय?
विषय मोठा गहन आहे. पुन्हा कधी तरी यावर लिहीन
No comments:
Post a Comment