आपल्याला पडणारी स्वप्नं अर्थपूर्ण असतात असा माझा समज आहे. काही स्वप्नं ही परत परत पडतात. असेच एक स्वप्न परीक्षेचे जे मला वारंवार पडते. परीक्षा १-२ दिवसावर आली आहे आणि माझा अजिबात अभ्यास झाला नाही असे ते स्वप्न. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या विषयाचा अभ्यास झाला नाही तो विषय म्हणजे मराठीच असतो आणि स्थिती अशी असते कि मराठीचे पुस्तकही मी उघडून बघितले नसते. स्वप्नं प्रतीकात्मक असतात असे समजले तर हे वारंवार पडणारे स्वप्नं माझ्या मनातील कोणत्यातरी भीतीचे रूप आहे. आयुष्यात एखाद्या परिस्थितीला तयारीशिवाय तोंड देण्याची माझी तयारी नसते, हे स्वप्नं कदाचित त्याचे प्रतिक असेल. पण मग मराठीच विषय का? कालखंड मात्र दहावी, बारावी, अभियांत्रिकी असा कोणताही असतो. किंवा परीक्षेची भीती अजूनही कायम असल्याचे हे लक्षण आहे आणि बाकी काही नाही.
तुम्हास याविषयी काय वाटते ते लिहा. अनघाने जो आत्महत्येविषयी लेख लिहिला त्याविषयी माझी मते पुढील ब्लोग वर!
No comments:
Post a Comment