आयुष्यात बदलाचे क्षण सतत येत राहतात. लग्न, नवीन नोकरी, परदेशगमन, स्वदेश आगमन, नवीन शहरात स्थायिक होणे, शाळा बदल अशा प्रसंगाला आपण सामोरे जातो. नवीन परिस्थितीत स्थिरावताना सुरुवातीचा काही काळ आपण मनाने मात्र आधीच्या स्थितीत गुंतलेले असतो.
उदाहरण घ्यायचे झाले तर परदेशातून परत आल्यावर देशातील कार्यालयात सुरुवातीचा काळ! परदेशातून परत आल्यावर प्रत्येकजण हा काही काळ स्वतःला परदेशीच समाजात असतो. आता हा काळ काहीजणांच्या बाबतीत विमानतळावरून बाहेर पडल्यावर टक्सीवाल्याबरोबर झालेल्या संभाषण बरोबर संपतो, तर काहीना यासाठी बरेच महिने जावे लागतात. कार्यालयात सुद्धा सुरुवातीला काहीजणांना थोडा भाव खाण्याची इच्छा असते तर बाकीच्या मात्र या परत आलेल्याची खेचण्याची सुप्त इच्छा असते. ही अदृश्य दरी कालांतराने मिटते. काही प्रसंग मात्र ही दरी लवकर मिटवण्यासाठी मदत करतात. उदाहरण द्यायचे झाले तर एखादा मोठा प्रश्न निर्माण होतो आणि रात्रभर थांबून सर्वाना एकत्रपणे हा प्रश्न सोडवावा लागतो. किंवा एखाद्या पार्टी मध्ये सर्वजण मिळून सहभागी होतात आणि मनाने एकत्र येतात. हे झाले एक उदाहरण!
मुद्दा हा आहे कि प्रत्येक बदलात असे स्थिरावण्याचे क्षण येत असतात, कौशल्य यात आहे की हे क्षण ओळखता आले पाहिजेत आणि पकडता आले पाहिजेत. मागील काळ रम्य होता यात प्रश्नच नाही परंतु नवीन काळ किती रम्य बनवू शकतो हे आपल्या हाती आहे. गरज आहे ती हे क्षण पकडण्याची.
No comments:
Post a Comment