गेल्या काही दिवसात BLOG लिहिण्याचा माझा वेग मंदावला आहे. परंतु सुटकेचा निश्वास टाकू नका. मी थोड्याच दिवसात पूर्वीच्याच किंबहुना त्याहून अधिक वेगाने BLOG लिहिण्यास सुरुवात करीन. सध्या मे महिन्याची सुट्टी असल्याने वसईच्या फेर्यांची वारंवारता वाढली आहे त्यामुळे BLOG लिहावयास कमी संधी मिळते.
गेल्या काही दिवसात बरीच लग्नांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली. लहानपणी लग्न म्हटले कि खूप मजा वाटे. लाडू, त्यावेळी मिळणारी प्लास्टिक ग्लास मधील लिंबू सरबते, अंगणात असणारा मांडव आणि त्यात हुंडारायला मिळणारा पूर्ण वाव यामुळे लग्न ही फार मोठी मौज वाटे. काळ बदलला, घरी लग्न करणे हे हळूहळू गैरसोयीचे होऊ लागले. आमच्या एकत्र कुटुंबात मोठ्या काकांच्या मुलीचे लग्न १९८४ साली घरीच झाले. त्यानंतर १९९३ सालापर्यंतची कुटुंबातील सर्व लग्ने घरीच झाली. जसजसे मोठे होत गेलो तसतसे लग्नातील मजा हळूहळू कमी होऊन जबाबदारी वाढली. Event Management ची संकल्पना पूर्ण स्थिरावण्याआधी कुटुंबातील विविध व्यक्ती मुख्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या अकलेनुसार विविध जबाबदार्या पार पडत असत. महाविद्यालयीन शिक्षण संपून नोकरी लागली. त्या कालावधीत लग्नाला जाण्याचा फारसा उत्साह नसे. चिकीस्तक लोकांच्या चौकश्याना तोंड देण्याची फारशी इच्छा नसे. समारंभाला उपस्थित नाही राहिला तर लोक तुला ओळखणार कसे? आईच्या या प्रश्नाने शंभरीचा आकडा गाठला आणि स्वतःच्या लग्नाची वेळ आली. स्वतःच्या लग्नानंतर सर्व समीकरणे बदलली. पत्नीच्या नात्यातील लग्नांची नवीन मिती त्यात समाविष्ट झाली. स्वतःच्या लग्नानंतरच्या प्रथम वर्षात बरीच लग्ने attend करावी लागली. काळ पुढे सरकला. आता हळूहळू आई वडिलांनी कुटुंबाच्या नात्यातील लग्ने attend करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली. आपल्यातील काही जणांवर ही जबाबदारी बरीच आधी आली. आता लग्नाला उपस्थित राहताना मुलाला AC HALL मध्ये खेळताना आणि लग्नाची मजा घेताना पाहून मन काही वर्षं मागे गेले. एक चक्र पूर्ण झाले होते.
बाकी आपल्या शाळेतील १९८० - १९९० या वर्षात दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांचा एक गट FACEBOOK वर बनविण्यात आला आहे. जमल्यास त्या गटाचे सदस्य बना.
No comments:
Post a Comment