शाळा-कॉलेजात शिकून आपल्याला भरपूर माहिती मिळते. पण त्याबरोबरच शिक्षणाचा खरा अर्थ उमगण हेही तितकच महत्वाच असत. अस म्हणतात बौद्धिक शिक्षणाचा प्रभाव विचारशक्तीवर पडतो,तर मूल्य शिक्षणाचा प्रभाव हृदयावर पडतो.
आपला भारत व्यावसायिक यशाच्या मागे लागलाय हे खर आहे. पण कोणताही नोकरी-व्यवसाय करताना आपली नितीमुल्य जपण हेही तितकच महत्वाच .
एकदा T.V.वर अभिनेता सतीश शहाची मुलाखत एकली. त्यात त्यांनी बोलताना म्हंटल होत शेवटी करोडपती माणूस जेवतो डाळभात आणि अगदी गरीब माणूसही जेवतो डाळभात . मग बँकेतल्या शिल्लकेतील आकड्यापुढील शुन्य वाढवण्यासाठी माणूस कित्ती धडपडत असतो . याचा अर्थ कायमच अल्पसंतुष्ट रहाव असा नाही . पण पैसा कमावण्याच्या नादात आपल सुख-समाधान ओंजळीतून निसटून तर जात नाहीना याच भान जरूर असाव .
एकाच गोष्टीकडे बघण्याचा दोन भिन्न व्यक्तींचा दृष्टीकोनही भिन्न असतो . या संदर्भात एक गोष्ट खूप पूर्वी मी वाचली होती . दोन भाऊ होते . त्यातल्या एका भावाला आमली पदार्थाचे व्यसन होते . तो दारुडा होता. तो कुटुंबियांना मारहाण करत असे. तर दुसरा भाऊ यशस्वी उद्योजक होता. त्याला समाजात मान होता. त्याच कुटुंब आनंदी होत. एकाच आई-वडिलांची दोन मुल, एकाच वातावरणात वाढलेली पण इतकी वेगळी कशी असा लोकांना प्रश्न पडे. त्यांनी पहिल्या भावाला त्याच्या वागणुकी बद्दल विचारल असता त्याने उत्तर दिल 'माझे वडील व्यसनी होते. ते आम्हाला मारहाण करत. मग माझ्या कडून तुम्ही काय अपेक्षा करणार? म्हणून मी हा असा आहे '.
दुसऱ्या चांगल वागणाऱ्या भावाला तोच प्रश्न विचारला असता त्याने सांगितल आमचे वडील आम्हाला दारू पिऊन मारहाण करत. मी लहानपणीच पक्क ठरवलं कि आपण अस कधीही वागायचं नाही. दोघही भाऊ एकाच गोष्टीतून शक्ती व प्रेरणा मिळवत होते. पण एक त्याचा सकारात्मक उपयोग करत होता तर दुसरा त्याची नकारात्मक बाजुच घट्ट पकडून जगत होता.
शेवटी दुसर्यांनी कस वागाव हे आपल्या हातात नाही पण आपण कस चांगल वागाव हे नक्कीच आपल्या हातातल आहे - असा विचार प्रत्येकाने केला तर एक चांगला समाज तयार व्हायला वेळ लागणार नाही.
No comments:
Post a Comment