Tuesday, May 4, 2010

२०:८०

IT व्यवसायात एक मजेशीर नियम / समजूत आहे. ८० टक्के चुका ह्या २० टक्के मूळ कारणांमुळे होतात. ही २० टक्के मूळ कारणे नष्ट केली तर या ८० टक्के चुकांवर नियंत्रण आणता येते. आता हाच नियम ३०:७० म्हणून सुद्धा ओळखला जाऊ शकतो.

थोडासा विचार करता असे जाणवले की हा नियम बर्याच ठिकाणी लागू होतो.
१> कार्यालयात २० टक्के लोक ८० टक्के कामाचा भार सांभाळतात.
२> प्रत्येक कर्मचारी २० टक्के वेळ खरोखर quality काम करतो. बाकीचा ८० टक्के वेळ पाट्या टाकतो.
३> प्रत्येक माणूस हा २० टक्के आयुष्य स्वतःसाठी जगतो आणि बाकीचं इतरांसाठी जगतो.
४> दुनियेतील ८० टक्के वाद (पती - पत्नी मधील भांडण सुद्धा) २० टक्के कारणांमुळे होतात.
५> प्रत्येक क्रिकेट सामन्यात संघातील २० टक्के खेळाडू चांगला performance देतात.

याचा अर्थ असा नव्हे की हा बाकीचा ८० टक्के भाग अगदीच निरुपयोगी आहे. Law of averages नुसार या ८० टक्के भागाचे अस्तित्व २० टक्के भागासाठी आवश्यक आहे.
महत्वाचा मुद्दा असा आहे की आपणास हा २० टक्के भाग ओळखता आला पाहिजे. जर मी दिवसात सकाळी उत्तम performance देऊ शकत असीन तर मला त्या वेळचा पुरेपूर उपयोग करता आला पाहिजे. मी जर एका क्रिकेट संघातील खेळाडू असेन आणि एखाद्या सामन्यात माझ्झा खेळ चांगला होत असेल तर मला त्यात सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
मी जर का १०० ब्लोग लिहित असेन तर त्यातील २० तरी वाचण्यायोग्य असतील, परंतु हे २० ब्लोग लिहिण्यासाठी मात्र मला बाकीचे ८० ब्लोग ही लिहावे लागतील.

No comments:

Post a Comment