बदलांचा स्वीकार
लग्न होऊन ठाण्यात आले आणि हळू-हळू येथे रुळले . आता तर ठाणे शहर खूप आवडत. शांत सोसायटी, जवळच असलेलं मारूतीच देऊळ, मोठ वाचनालाय, समवयस्क मैत्रिणी सर्व अगदी मनाजोगतं. ह्या सर्व जरी जमेच्या बाजू असल्या तरी मुख्य-रस्त्यावर आल्याबरोबर जाणवत ते प्रदूषण,चालायलाही त्रास व्हावा इतके माणसांनी भरलेले रस्ते , जागो-जागी पालिकेने खणून ठेवलेले रस्ते, रोज दुपारी मुलीला शाळेतून आणताना ठराविक ठिकाणी रस्त्यात ट्रॉफिक मध्ये मोडणारा अर्धा तास हे सर्व फार कंटाळवाण वाटत आणि मनात विचार येतो अजून वीस वर्षांनी इथली परिस्थिती कशी असेल याचा. मग आठवत माझ लहानपण . वसईतील हिरवाई, शांत परिसर, आपली शाळा. आता तर वसईत हि खूप बदल झालाय . खरं तर हा बदल सर्वच गावात शहरात होतोय. नव्हे पूर्ण देशात. ठाण्यात घोडबंदर रस्त्यावर असलेले बरेचसे डोंगर फोडून त्याजागी उंच इमारती गेल्या दहा वर्षात उभ्या राहिलेल्या मी पहिल्या. शेवटी फिरून सर्व समस्याच मूळ जाणवत ते लोकसंख्या-वाढीत.त्यासाठी जेवढे प्रयत्न सरकार कडून व्हायला हवेत तेवढे होत नसावेत कारण चीन सारख्या देशाने वाढत्या लोकसंखेवर बर्र्यापैकी नियंत्रण मिळवलेलं दिसत.
माणसाचा स्वभाव प्राप्त परिस्थितीनुसार बदलत असावा. त्याशिवायच का हे बदल मी स्वीकारले असतील.म्हणजे बघाना मला या गर्दीची हि सवय झालीये . कधीतरी एखाद्या संध्याकाळी गर्दीत मिसळून जाऊन window shopping करायला आवडत आता. जस एखाद न आवडणार गाण चुकून एक- दोनदा कानावर पडल कि सहज आपल्याही तोंडात गुणगुणण्यासाठी याव तसं.
No comments:
Post a Comment