Monday, May 17, 2010
‘नवे कुटुंब, नवा तोल; नवे उपाय, नवे बोल।’
शनिवार, १५ मे २०१०काळ कुणासाठीच थांबत नाही, पण काळाबरोबर बदलही अपरिहार्य असतो. काळाच्या ओघात टिकून राहायचे असेल तर काळानुरूप बदलांशी जमवून घेता यायला हवे. त्यासाठी आवश्यक ती जीवनकौशल्ये आत्मसात करायला हवीत. बदलांना सामोरे जाताना मूलभूत नैतिक अधिष्ठानही कायम राखता यायला हवे. हे सारं जमवायचं कसं? बदल अपरिहार्य असले तरी कौटुंबिक नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी दैनंदिन व्यवहारात काय उपाय योजता येतील? कुठली जीवनकौशल्ये आपल्याला यापुढे स्वत:त भिनवावी लागतील? ती कशी आत्मसात करता येतील? ‘नवे कुटुंब, नवा तोल; नवे उपाय, नवे बोल।’ या विषयावर ‘समन्वय’ संस्थेतर्फे जागतिक कुटुंबदिनानिमित्त राज्यस्तरीय खुली मराठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आपले निबंध सुमारे ७५० शब्दमर्यादेपर्यंत सुवाच्य अक्षरात लिहून १२ जून २०१० पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावेत. पत्ता : समन्वय ६, श्रेयस, तळमजला, डी. एल. वैद्य रोड, दादर (प.), मुंबई-२८. अधिक माहितीसाठी संपर्क : २४३२४८४९.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment