साधारण चौदा वर्षापूर्वीची गोष्ट. ठाण्यात "ठाणे वार्ता" नावच बातमीपत्र सुरु झाल. त्यासाठी त्यांना वृत-निवेदिकांची आवशकता असल्याच कळल. रीतसर अर्ज केला. ऑडीशन टेस्ट झाली आणि माझी निवड होऊन मी रोज बातम्या देऊ लागले. हळू-हळू लोक ठाणेवार्ताची वृत्त-निवेदिका म्हणून ओळखू लागले. लोकांचे अभिप्राय मिळू लागले. अधेमधे आया-बाया, आजी-आजोबा आम्ही 'ठाणे वार्ता' बघतो अस आवर्जून सांगत. काही सडेतोड प्रतिक्रिया हि मिळत. अहो तुम्ही प्रत्यक्षात पेक्षा T.V. वर छान दिसता. मग मी हि हसून म्हणे अहो तेथे मेकप असतोना म्हणून.
खरच विचार करण्यासारखा मुदा वाटला. चेहर्यातले drawbacks कमी करण्यासाठी मेकअप असतो. तसं स्वभावातील दोष दूर करण्यासाठी काय असत? चारचौघात तात्पुरता आणलेला आव (चांगुलपणाचा) उपयोगी नसतो. कारण माणसाच्या शरीरातला 'मन' हा असा घटक आहे जो आपण केलेल्या चुकांची सतत बोच देत असतो.
मला वाटत त्यासाठी सर्वांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज असते. जस आपण घराची साफसफाई करतो, शरीराच्या स्वच्छ्यतेसाठी रोज अंघोळ करतो. तसच मनाच्या शुद्धीसाठीही प्रयत्न केले पाहिजेत. अशी मनाची शुद्धी झाली तर भाऊ-बंदकीतील वाद, सासवा-सुनातील भांडणे, मित्र-मैत्रिणीतील हेवेदावे, पेपरात वाचतो तसे खून, मारामार्र्या, आत्महत्या होणार नाहीत.
खरतर मोह-मायाच्या या संसारात राहून अशी मनाची शुद्धी करण खरच कठीण. पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे.
No comments:
Post a Comment