Friday, June 14, 2013

वसई एक चित्रमय प्रवास!



वसई एक सुंदर गाव होते. होते म्हणायचे कारण म्हणजे आता वसई शहर बनले आहे. महानगरपालिका आली आहे आमच्या वसईत. इमारती वाढल्या आहेत. आणि लोक आधुनिक बनायचा प्रयत्न करू लागले आहेत. असे असले तरी मुळचे आम्ही वसईकर जसे पूर्वी आहोत तसेच मनापासून आहोत. आणि वसईचा निसर्ग आपली हिरव्यागार अदाकारीने आम्हाला मोहवून टाकत असतो. अशाच आमच्या वसईतील निसर्गाची टिपलेली ही काही चित्रे!

सुरुवात करूया वसईच्या पावसाने! हा मुसळधार कोसळणारा पाऊस घरातून बघायला अगदी मस्त वाटतो.







 
पक्क्या वसईकराला अशा पावसात मावर (मासे) लागणारच. मासे नाही मिळाले तर सुक्क्याचे तर हवेच. अशा वेळी दारी कोळीण आली तर कोण आनंद!





पावसाळ्याच्या चार महिन्यात हा धो धो कोसळतो. पूर्वी शेतकरी असलेल्या कुटुंबात हे चार महिने एकदम गडबडीचे असायचे. आता उरल्या त्या आठवणी.

मग सप्टेंबर उजाडतो. पावसाने सर्व काही स्वच्छ धुवून काढलेले असते. बावखल कसे भरून गेले असते



पावसाळा स्थिरावला की तेरडा दिसू लागतो. ह्या तेरड्याचे वेगवेगळे प्रकार अहेत. त्यातील हा आपसूक उगवणारा गावठी तेरडा. ह्याचीच गौरी करून आमच्या घरी मांडतात.










गणपती गौरी येतात. वसईकर आपले घरगुती गणपती मोठ्या उत्साहाने साजरे करतात. म्हणता म्हणता सप्टेंबरही सरतो. ऑक्टोबर, नोवेंबर मध्ये हिरव्यागार वसईवर आपली किरणे फैलावणारा सूर्य आणि पावसाने धुवून निघालेल्या आकाशात रेंगाळणारे पांढरे ढग आणि आजूबाजूची हिरवी वृक्षवल्ली आपल्या मनाला  काही मनमोहक रूपांनी आनंदून टाकतात.



 

 

 

 


 

 


 


 

 





 

 



 
अशा आनंददायी वातावरणाने आनंदलेले हे बाल फुलपाखरू आपल्याच नादात अंगणात बागडत असते.




माझे आवडते झाड सुबाभूळ कसे चैतन्याने भरून गेले असते
 


मग प्राजक्ताचे झाड कसे मागे राहणार!


 
अशाच एका सूर्यप्रकाशाने न्हाउन निघालेल्या संध्याकाळी वसई किल्ल्याचा परिसर आपल्याला सुंदर रूपे दाखवितो




डिसेंबर - जानेवारीत आंब्याचा पहिला मोहोर मनाला सुखावून टाकतो.












माझ्या काकीला (मोठीआई) बागेतला कचरा पेटवून द्यायची खुमखुमी येते.




पोरांची मग ही धमाल होते!



 
नंतर मार्च - एप्रिल मध्ये मोठीआईने लागवड केलेले दुधी एकदम बहरतात







मग पुन्हा मे येतो आणि मग हे फुलांनी बहरलेले झाड



 

आणि हे एक मनोहर अननस




अशी ही एका वसईकराने टिपलेली वसईची काही मनमोहक रूपे! अजून कितीतरी नयनरम्य रूपांचा खजाना वसईत दडला आहे!

3 comments: