Thursday, June 27, 2013

तपोवन - भाग ३



महर्षीबरोबर झालेल्या चर्चेनंतर सुद्धा सिद्धार्थच्या मनातील विचारांचे वादळ काही शमले नव्हते. पित्याच्या आज्ञेचे पालन करण्याचे आपले कर्तव्य परिपूर्णपणे पार पाडण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता. कालचक्र तर पुढेच चालले होते. मनात कितीही इच्छा असली तरी ते आतापर्यंत कोणीही थांबवू शकले नव्हते. काही कालावधीनंतर अध्ययनात सिद्धार्थला गोडी वाटू लागली होती. वेद, श्लोक ह्यांचे पठण करताना तो मग्न होत होता. परंतु रात्रीच्या शांत वेळी मनातील शौर्याची खुमखुमी बाहेर येत असे.
महर्षीबरोबर सिद्धार्थ आणि शिष्यगणाचा थेट संवाद क्वचितच होत असे. प्रशिक्षणाची जबाबदारी ज्येष्ठ गुरुवर्गाकडे सोपविण्यात आली होती. गुरुवर्य आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा आश्रमाच्या परिसरात राहत असत.
हिवाळ्याने एव्हाना आपला जम बसविला होता. महाकाय वृक्षांनी आपला पर्णसंभार गाळून टाकला होता. सिद्धार्थला हे वातावरण चांगलेच आवडले होते. महर्षीची परवानगी घेऊन संध्याकाळच्या मोकळ्या वेळात जंगलात जवळपास फेरफटका मारण्यास त्याने सुरुवात केली होती. त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना जंगलात जास्त आत जाण्यास परवानगी नव्हती. त्या भागात हिंस्त्र पशूंचा वावर असे.
अशाच एका संध्याकाळी सिद्धार्थ आपल्या मित्रांबरोबर सायंकाळच्या फेरफटक्याला निघण्याच्या तयारीत होता. अचानक जंगलातून एका तरुण स्त्रीचा 'वाचवा, वाचवा!' असा आक्रोश आश्रमापर्यंत ऐकू आला. क्षणभर काय करावे हे कोणालाच कळेना. तपाला बसलेल्या महर्षीना उठविण्याची कोणामध्ये हिम्मत नव्हती. इतक्यात धनुष्यबाण घेऊन बाहेर येणाऱ्या महर्षीना पाहून सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. 'सिद्धार्थ, हे धनुष्यबाण घे आणि त्या अबलेची सुटका कर!' महर्षीनी आज्ञा केली. क्षणाचाही विलंब न करता सिद्धार्थने  धनुष्यबाणासहित जंगलाच्या दिशेने सुसाट धाव घेतली.
जंगलात थोडे अंतर कापून जाताच सिद्धार्थला ते दृश्य दिसले. जेष्ठ गुरु भारद्वाज ह्यांची कन्या सीमंतिनी  एका वृक्षावर थरथर कापत बसली होती. आणि संतप्त वनराज सिंह त्या वृक्षाखाली फेऱ्या घालीत बसले होते. सिंहाची क्रुद्ध नजर सीमंतिनीवर रोखून होती. सिद्धार्थने आपला बाण धनुष्याला लावला आणि सिंहाच्या मस्तकाचा वेध घेतला. नेम अचूक होता आणि लक्ष्याच्या दिशेने वेगाने चालला होता. शेवटच्या क्षणी सिंहाने हालचाल केली व बाण त्याच्या बरगड्यात घुसला. अतिक्रुद्ध झालेल्या सिंहाचे लक्ष सिद्धार्थकडे गेले. त्या महाकाय वनराजाने सिद्धार्थ्च्या अंगावर झेप घेतली. अचानक झालेल्या ह्या हल्ल्याने सिद्धार्थ थोडा गांगरला. परंतु राजघराण्यातील रक्त होते ते! आपल्या बलदंड बाहूंनी त्याने सिंहाचा जबडा घट्ट पकडून ठेवला. तोवर महर्षी आणि आश्रमवासी येउन पोहोचले होते. अचानक आलेल्या ह्या माणसाच्या गर्दीने वनराज विचलित झाले. सिद्धार्थच्या हातातील आपला जबडा सोडवून घेवून त्यांनी जंगलात प्रयाण केले.
सर्व आश्रमवासी सिद्धार्थाच्या चौकशीत / कौतुकात गुंतले. आपल्या पित्याच्या आश्वासक मिठीत विसावलेल्या  सतत सिद्धार्थवर खिळलेली सीमंतिनीची नजर पाहून महर्षी मात्र काहीसे चिंतीत झाले होते.   


 

1 comment:

  1. नमस्कार मंडळी,

    मराठीब्लोग्स.इन चे बिटा व्हर्जन फक्त आपल्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे.

    आत्ताच http://marathiblogs.in ला भेट द्या, नोंदणी करा,(*पुन्हा नवी नोंदणी) , आणि आपल्या ब्लॉग मधील कोणतीही लिंक मराठीब्लॉग्स.इन वर शेअर करा.
    तसेच आपण RSS फीड ने देखील आपला ब्लॉग येथे जोडू शकता.(http://marathiblogs.in/page.php?page=contact-us)

    ३१ जुलै पर्यन्त आपले सर्वोत्तम ब्लॉग पोस्ट मराठीब्लॉग्स.इन वर शेअर करा,
    जास्तीत जास्त वोट्स मिळवण्यासाठी आजच आपला ब्लॉग मराठीब्लॉग्स.इन वर जोडा.
    ज्या पोस्ट ला सर्वाधिक वोट्स(मते) मिळतील, त्यांना खालील बक्षिसे देण्यात येतील.
    १. मृत्युंजय (मराठी पुस्तक) मेहता पब्लिशिंग हाऊस किंवा रुपये २५० ची कोणत्याही मराठी पुस्तकावर सवलत.(मराठीबोली.कॉम)
    २. रुपये १०० ची कोणत्याही मराठी पुस्तकावर सवलत. (मराठीबोली.कॉम)
    ३. रुपये ५० ची कोणत्याही मराठी पुस्तकावर सवलत. (मराठीबोली.कॉम)

    स्पर्धेचे नियम.
    १. ब्लॉग मराठीतच असावा.
    २. ब्लॉग च्या होमपेज वर मराठीब्लोग्स.इन चे वीजेट.
    ३. ब्लॉग पोस्ट आपण शेअर करू शकता, आणि आपल्या मित्रांना त्यावर वोट करायला सांगू शकता.
    त्यासाठी आपल्या मित्रांना फक्त मराठीब्लोग्स.इन वर नोंदणी करावी लागेल.(त्यांचा स्वतचा ब्लॉग असण्याची आवश्यकता नाही.)
    ४. स्पर्धेचा निकाल फक्त सर्वाधिक वोट्स वर अवलंबून असेल.
    ५. चुकीच्या किंवा खोट्या वोट्स वर आधारित ब्लॉगला स्पर्धेबाहेर काढण्याचा हक्क मराठीब्लॉग्स.इन कडे राखीव.

    स्पर्धा लवकरच मराठीब्लॉग्स.इन संकेतस्थळावर सर्वांसाठी जाहीर करण्यात येईल.

    ReplyDelete