Sunday, April 28, 2013

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र - एका बदलत्या चित्राच्या निमित्ताने - भाग २

 




आज इथे थोडा हा खोलात जाण्याचा प्रयत्न! आज्ञावली लिहिण्यासाठी कोणत्या कौशल्यांची गरज आहे ह्याचा आपण आढावा घेवूयात
१> गणिती डोके. बर्याच वेळा क्लिष्ट आकडेवारी करण्यासाठीची आज्ञावली लिहावी लागते. ही आज्ञावली लिहिण्याचा एक अचूक मार्ग असतो आणि अनेक अपरिणामकारक मार्ग असतात. अचूक मार्गाने आज्ञावली लिहिण्यासाठी गणिती डोके आवश्यक आहे. जसजसे एखादी कंपनी ह्या क्षेत्रातील
प्रगल्भतेच्या पायऱ्या ओलांडू लागते तेव्हा तिला अचूक मार्गाने आज्ञावली लिहिणाऱ्या संगणक प्रोग्रामरची गरज भासते.
२> Domain Knowledge - अर्थात एका विशिष्ट क्षेत्रातील व्यावसायिक ज्ञान. साधारणतः ३ - ४ वर्षे प्रोग्रामिंग केलेल्या संगणकीय व्यावसायिकास एखादया विशिष्ट क्षेत्रातील सखोल ज्ञान असणे आवश्यक असते. ह्या ज्ञानाचा वापर तो अस्तित्वात असलेल्या आज्ञावलीत क्लिष्ट व्यावसायिक तत्वे (business logic) सहजतेने समजून घेण्यासाठी करून घेवू शकतो. त्याचप्रमाणे एखादी नवीन व्यावसायिक गरज (business requirement) आल्यास ती कितपत व्यवहार्य आहे आणि ती आज्ञावलीत समाविष्ट करण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांचा अचूक अंदाज हा व्यावसायिक देवू शकतो.
वरीलपैकी पहिला घटक हा बर्यापैकी तुमच्या नैसर्गिक गुणवत्तेवर अवलंबून असतो. फार तर एखादी संगणकीय भाषा अधिकाधिक अचूकपणे शिकून तुम्ही त्यात थोडीफार सफाई आणू शकता. आणि दर वर्षी हा घटक असणारे हजारोजण ह्या क्षेत्रात प्रवेश करीत असतात त्यामुळे आपले वेगळेपण टिकविण्यासाठी हा घटक फार काळ तुमची साथ देवू शकत नाही.
दुसर्या घटकासाठी चिकाटीची आवश्यकता असते. तात्कालिक प्रलोभने (जशी की दुसर्या क्षेत्रातील परदेशगमनाची संधी) तुम्हांला विचलित करीत असतात. परंतु जर तुम्हास खरोखर दीर्घकाळ माहिती आणि तंत्रज्ञान ह्या क्षेत्रात राहायचे असेल तर ह्या विचलीत करणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ (SME) बनणे अत्यावश्यक आहे.
वरील सर्व चर्चेत तुम्ही TCS, INFOSYS सारख्या संगणक तज्ञ पुरवणाऱ्या कंपन्यात काम करीत आहात की मोठ्या आर्थिक कंपन्याच्या भारतीय शाखेत (CAPTIVE) काम करीत आहात हा महत्वाचा मुद्दा येतो.
एकंदरीत सुरुवातीची पाच सहा वर्षे ह्या क्षेत्रात काढल्यावर बर्याच जणांना आज्ञावली लिहिणे नकोसे वाटू लागते. नवीन लोकांशी करावी लागणारी स्पर्धा,
वैयक्तिक जीवनात वाढलेल्या जबाबदार्या, वाढलेल्या आर्थिक लाभाचा  कंपनीला केवळ आज्ञावली लिहून मोबदला देवू शकण्याच्या आत्मविश्वासाचा अभाव अशा बर्याच कारणांमुळे असे घडते. मग हे लोक वेगवेगळे मार्ग अवलंबितात. त्यांचा उहापोह पुढील लेखात!

No comments:

Post a Comment