Wednesday, October 29, 2014

दिवाळीचे दिवस!


दिवाळीच्या सुट्टीनंतर ऑफिसात परतताना कसा कंटाळा येतो. इतकी वर्षे झाली, इतके मोठे झालो तरी मुक्त वातावरणातून बंधनात शिरताना कंटाळा येतोच. एका अर्थी चांगलं लक्षण आहे ते! अजूनही मन पूर्ण यांत्रिकरित्या वागू न लागल्याचं लक्षण! वसईतील दिवाळी अतिउत्तम! पण खरं म्हटलं तर नोव्हेंबरातील दिवाळीची मजा ऑक्टोबरमधल्या दिवाळीला नाही. नोव्हेंबरात थंडी कशी मस्त पडते! असो आपलं पंचांग खूपच जुनं आहे आणि त्यामुळे त्यात बदल करणं वगैरे शक्य नाही.
दिवाळीच्या एक आठवडा आधी अंगणात कणगा काढण्याची पद्धत आहे. पूर्वी तो चुलीच्या राखेने काढत. हल्ली चुली कोणी वापरत नाही, मग रांगोळीनेच काढावा लागतो. लहानपणी हा कणगा काढला की खूप मजा यायची, दिवाळीच्या आगमनाची सूचना मिळायची. बहुदा सहामाही परीक्षा आटोपलेल्या असायच्या. आणि मुलं हुंडारायला मोकळी व्हायची. आई आणि महिलावर्गाची फराळाची धांदल सुरु असायची. मुलांना दुसरा काही उद्योग नसल्याने अंगणात सुई आणि चतुर पकडण्यात त्यांचा वेळ जायचा.

पुढे वाचा!

http://patil2011.blogspot.in/2014/10/blog-post_30.html

 

Saturday, October 25, 2014

वन नाईट @ द कॉल सेंटर - चेतन भगत

 
मागे चेन्नई एक्प्रेसच्या पहिल्या दिवशीच्या शोला वसईत आगाऊ (म्हणजे ऍडवान्स) बुकिंग न करता आम्ही गेलो होतो आणि त्यावेळी शेवटची का होईना पण तिकिटे मिळाली होती. त्या आठवणीच्या जोरावर काल Happy New Year पाहण्यासाठी ऐन वेळी गेलो पण तिकिटे मिळाली नाहीत. आता मॉलमध्ये आलोच आहोत तर भटकुयात म्हणताना पावलं पुस्तकाच्या दुकानाच्या दिशेने वळली. 
मी सद्यकाळात बऱ्याच जुन्या गोष्टींचा घोष करत असतो असं मला जाणवतं. त्याला अनुसरून कालही मी आधी जुन्या पुस्तकांकडे वळलो. पण अचानक मग नवीन पुस्तकांचा विभाग सुरु झाला आणि मग चेतन भगतची काही पुस्तके दृष्टीस पडली. माझी पुतणी चेतन भगतची मोठी चाहती. तिच्याकडून चेतन भगतविषयीच्या माझ्या ज्ञानात खूप भर पडली आहे. चेतन भगत हा नवीन पिढीचा लाडका लेखक! त्यामुळे त्याच्या पुस्तकाद्वारे नवीन पिढीच्या मानसिकतेमध्ये डोकावून पाहता येईल ह्या विचाराने दोन पुस्तकं विकत घेतली. त्यातलं पहिलं म्हणजे ह्या ब्लॉगपोस्टचे शीर्षक! अजून एक गोष्ट, मी ह्या पुस्तकाचं सुप्रिया वकील ह्यांनी केलेल्या मराठी अनुवादरूप विकत घेतलं. माझं काही खरं नाही मंडळी - गडी अमेरिकन कंपनीत इंग्रजीत दैनंदिन व्यवहार करतो पण त्याला त्या व्यवहारापलीकडे इंग्रजी झेपत नाही!
चेतन भगतच्या पुस्तकांची नावं सुद्धा अगदी खास असतात. अगदी तो IIT मधून शिकल्याचं द्योतक असणारी. आता ही सुद्धा (म्हणजे पुस्तकाची अथवा त्यावर आधारित सिनेमाची नावं) ऐकीव माहितीवर आधारित असल्याने चूकभूल दद्यावी घ्यावी! Three Idiot, Two State, One Night @ the Call Center आणि आता Half Girlfriend!! बहुदा गडी बटाटा पाव किलो, १०० ग्राम अर्थात १ तोळा सोने अशी पुस्तकाची नावे पुढच्या काळात निवडेल की काय असा संशय माझ्या मनात निर्माण झाला आहे.
  पुढे वाचा
 http://patil2011.blogspot.in/2014/10/blog-post_25.html

Thursday, October 23, 2014

शाळा - मिलिंद बोकील

 

बरेच दिवस नवीन पुस्तक वाचन झालं नव्हतं.  एक शालेय मित्र अधूनमधून नवीन  पुस्तकांची शिफारस करत असतो. परंतु कामाच्या बोज्याचा बहाणा करून ही पुस्तकं वाचायची राहून जातात. पण गेला शनिवार चांगला उजाडला. दिवाळीच्या निमित्ताने  हल्ली जी काही अनेक ट्रेड फेयर निघतात त्यातील एकात आपण जाऊयात अशी फर्मानवजा विनंती करण्यात आली. आता शनिवारी सायंकाळी अशी विनंती नाकारण्याचे दुष्परिणाम अनुभवाने माहित झाल्याने मी निमुटपणे निघालो.  आणि हे प्रदर्शन आमच्या समाजाच्या सभागृहात असल्याने आपल्या ज्ञातीतील ओळखींची उजळणी होण्यास मदत होते हा एक साईड बेनिफिट!!

पुढे वाचा …
http://patil2011.blogspot.in/2014/10/blog-post_23.html 

Sunday, October 19, 2014

दुरावा - १०गावाला तातडीने पोहोचताना इवाची तशी धावपळच झाली. ऑफिसातून रजा टाकून मग ती काहीशा अपराधीपणानेच गावाला पोहोचली. आंद्रेईच्या आईनेच तिचं दरवाज्यात स्वागत केलं. इवाला काहीसं आश्चर्य वाटलं आणि थोडाशी निराशाही वाटली. ह्या क्षणाला तिला तिच्या आईशी फक्त एकटीनेच बोलायचं होतं. पण आता काही इलाज नव्हता. आई बिछान्यात बसली होती, उशीला टेकून. समोर स्टूलवर आंद्रेईच्या आईने करून ठेवलेल्या गरम दुधाचा ग्लास होता. इवाला बघताच आईचे डोळे एकदम आनंदाने चमकले. इवा धावतच आईच्या कुशीत शिरली. आतापर्यंत रोखून ठेवलेल्या अश्रूंना तिने मोकळी वाट करून दिली. ह्या क्षणी मायलेकींना एकांतात हितगुज करून द्यावे इतकी समज आंद्रेईच्या आई, मरीनाला होती. त्यामुळे काहीतरी निमित्त काढून ती किचनमध्ये गेली.

पुढे वाचा 

http://patil2011.blogspot.in/2014/10/blog-post_19.html

Wednesday, October 15, 2014

दुरावा - ९

 

सर्जीच्या मॉस्कोतील प्रशिक्षणाचे तीन महिने पूर्ण झाले होते. प्रशिक्षण वर्गाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना एका मीटिंगसाठी बोलावलं तेव्हा सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती. अभ्यासक्रमाच्या मध्यावर एखादी महत्वाची घोषणा सर्वांना अपेक्षित होती. मुख्य अधिकाऱ्यांनी वर्गात प्रवेश केला तेव्हा एकदम शांतता पसरली. त्यांनी आतापर्यंत सर्वांनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केलं. "ह्या वर्षीपासून आम्ही एक नवीन योजना सुरु करीत आहोत. ह्या वर्गातील ह्या टप्प्यावरील प्रथम तिघांना आम्ही दुसऱ्या सत्रासाठी तीन महिन्यासाठी जर्मनीला पाठवीत आहोत!" ह्या घोषणेने वर्गात अजूनच उत्सुकता पसरली. "तिसऱ्या क्रमांकावर आहे … , दुसऱ्या क्रमांकावर आहे …. " तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आपलं नाव नसल्याचं पाहून सर्जी नाराज झाला. पहिल्या क्रमांकावर आपण असल्याची शक्यता जवळजवळ नाहीच असंच त्याला वाटत होतं. "आणि पहिल्या क्रमांकावर आहे सर्जी!" ही घोषणा ऐकताच सर्जीचा आपल्या कानावर विश्वासच बसेना.

पुढे वाचा
http://patil2011.blogspot.in/2014/10/blog-post_16.html 

Sunday, October 12, 2014

दुरावा - ८

 
 रात्रभर इवाच्या डोळ्याला डोळा लागला नाही.  म्हटलं तर चूक तिचीच होती. सर्जीप्रकरण इतकं पुढं गेलं असता तिनं आईला थोडीतरी कल्पना देऊन ठेवावयास हवी होती. आईचं काय? गावात बसून शहरात राहणाऱ्या आपल्या मुलीच्या भवितव्याची काळजी नाही करणार तर मग ती आई कसली? आणि मग तिने आपल्या पद्धतीने आंद्रेई आणि इवाची ओळख करून द्यायचा घाट घातला होता. पहाटेच्या सुमारास इवाला कशीबशी झोप लागली. स्वप्नात सर्जी यावा आणि त्याने असेच आपल्याला उचलून न्यावे अशी तिची फार इच्छा झाली होती. अगदी सर्जीच्या अरसिकपणाला पूर्ण स्वीकारायची तिची आज तयारी होती.
अचानक बाहेरच्या दरवाज्यावरील जोरदार खटखटाने तिची झोप मोडली गेली. खोलीतील घड्याळाकडे तिचे लक्ष गेलं. केवळ सात वाजले होते. "इतक्या सकाळ सकाळी कोण आलं" असा विचार इवाच्या मनात आला. तिने हळूच कानोसा घेतला. आंद्रेई आणि आईचं बोलणं चाललं होतं. आंद्रेईने त्याच्या शेतावर ह्या तिघांना बोलावलं होतं. २० किमी अंतरावर त्याचं गव्हाचं फार मोठं शेत होतं. काही मिनिटात तो निघून गेला. बहुदा त्याला आईने नकार दिला असावा असं समजून इवाला हायसं वाटलं. आणि तिने डोक्यावरून जाडी घोंगडी ओढून घेतली. दोन तीन मिनिटात तिला खोलीत पावलांचा आवाज आला. तरीही तिनं घोंगडी डोक्यावरून बाजूला केली नाही. मग एक मिनिटाने वगैरे "इवा" अशी तिच्या वडिलांची हाक तिच्या कानी आली. वडील आपल्या खोलीत आले हे जाणवताच इवा पटकन उठून बसली. "झोप लागली का पोरी!" वडिलांच्या ह्या प्रेमळ स्वराने तिला अगदी लहानपणाची आठवण झाली. "हो लागली!" वडिलांना बरं वाटावं म्हणून तिने बळेबळे खोटंच उत्तर दिलं. एव्हाना आईचं सुद्धा खोलीत आगमन झालं होतं.

पुढे वाचा …


http://patil2011.blogspot.in/2014/10/blog-post_12.html

 

Thursday, October 9, 2014

दुरावा - ७

 
पुढील भाग वाचण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा.

http://patil2011.blogspot.in/2014/10/blog-post_10.html


Monday, October 6, 2014

दुरावा - ६

 

कथेचा पुढील भाग
दुरावा - ६

Saturday, October 4, 2014

दुरावा - ५

 
मी आता एका नव्या ब्लॉगवर स्थलांतरित होत आहे. हा ब्लॉग आधुनिक स्वरूपातील असल्याने मला ब्लॉग हिट संख्येची आकडेवारी आणि बाकीची माहिती विस्तृत स्वरुपात उपलब्ध होईल. हा नवीन ब्लॉग मराठी ब्लॉग विश्वाला जोडला जाण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मी नवीन ब्लॉगची लिंक इथे देत राहीन.
आधीच्या ब्लॉगला जितका प्रतिसाद आपण दिलात तसाच ह्या नवीन ब्लॉगलाही दयावात ही नम्र विनंती! धन्यवाद!

http://patil2011.blogspot.in/2014/10/blog-post_5.html