Monday, February 23, 2015

बारावी परीक्षा, जास्तीचा अर्धा तास, १० मिनिटे !

 
 http://patil2011.blogspot.in/2015/02/blog-post_24.html

गेल्या शनिवारी बारावी परीक्षा सुरु झाली. हल्ली दरवर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवडीचा पात्रतानिकष बदलण्याची पद्धत सुरु झाली आहे. ह्या वर्षी बारावीच्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (HSC) मध्ये मिळालेल्या गुणांना ४० टक्के प्राधान्य आणि IIT Main परीक्षेत मिळालेल्या गुणांना ६० टक्के प्राधान्य (किंवा जडत्व) असा नियम अस्तित्वात आहे असे ऐकण्यात आले. काही विशिष्ट कारणांमुळे पुढील वर्षी हा नियम बासनात गुंडाळला जाऊन CET (सामायिक प्रवेश परीक्षा) उच्च माध्यमिक शालांत परीक्षेसोबत अस्तित्वात येईल असे ऐकण्यात येत आहे.  अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवडीचा पात्रतानिकष ठरविणाऱ्या ज्या अधिकृत व्यक्ती किंवा संस्था आहेत त्या कोणत्या निकषांचा आधार घेऊन हे निर्णय घेतात ह्याविषयी अजिबात पारदर्शकता नाही. ही पारदर्शकता असणे फार महत्वाचे आहे. पुढील वर्षी जे बारावीची परीक्षा देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी यंदाचे अकरावीचे वर्ष IIT Main चा अभ्यास करण्यात गुंतविले असेल. आता अचानक पात्रतानिकषात बदल झाल्याने त्यांना आपले धोरण बदलावे लागणार. त्यांना झालेल्या ह्या मनःस्तापाची जबाबदारी कोणाची? आदर्श जगात पुढील दहा वर्षात भारतात / जगात कोणत्या शाखेच्या अभियंत्यांची गरज असणार त्यानुसार आपण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विविध शाखेत प्रवेश दिल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ठरविली पाहिजे. पण हे कधी होणार नाही हे आपण सर्व जाणुन आहोत. ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या अभियंत्यांना मिळणाऱ्या नोकरीचे प्रमाण अगदी अल्प आहे त्या महाविद्यालयात सुद्धा प्रवेशासाठी झुंबड उडाल्याचे चित्र दिसते. अभियांत्रिकी नंतर नोकरी नाही मिळाली की मग पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं असे द्रुष्टचक्र सुरु राहते.  मूळ मुद्दा असा आहे की जोवर आपण अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नियंत्रित करीत नाही तोवर प्रवेशाचा निकष ही काही फार महत्वाची गोष्ट नाही. निकष कोणताही ठेवा जोवर पैसा देऊन प्रवेश मिळतो तोवर दर्जा हा घसरणारच! असे असताना मग सतत निकष बदलून आधीच अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेल्या मुलांना अजून दडपण का द्यावे?  ह्या वर्षी काही चांगले निर्णय घेण्यात आले. उत्तरपत्रिका अर्धा तास आधी आणि प्रश्नपत्रिका दहा मिनिटं आधी हा नक्कीच चांगला निर्णय आहे. उत्तरपत्रिका अर्धा तास आधी मिळाल्यावर विद्यार्थी त्यावर पेन्सिलीने कोणते कच्चे काम करू शकतात ह्याविषयी काहीशी संदिग्धता माझ्या मनात आहे. आदर्श जगात त्यांनी खालील गोष्टी कराव्यात  १> उत्तरपत्रिका चांगल्या स्थितीत आहे हे तपासून घ्यावं. गरज पडल्यास बदलून देण्याची विनंती करावी.  २> आपला आसनक्रमांक योग्य ठिकाणी लिहावा.  ३> प्रत्येक विषयात काही क्लिष्ट सूत्रे, आकृत्या असतात. एकदा प्रश्नपत्रिका हाती आली की आपले लक्ष प्रश्नांकडे जाते. त्यामुळे केवळ उत्तरपत्रिका हातात असताना ही सूत्रे, आकृत्या कच्च्या रुपात मागच्या पानावर आधीच उतरवून ठेवण्याची विद्यार्थ्यांना परवानगी असायला हवी. ती बहुदा सध्या नाही. ह्या बाबतीत कोणाला खात्रीलायक माहिती असल्यास त्यांनी ह्या पोस्टला अभिप्राय द्यावा.  त्यानंतर मुख्य वेळेच्या दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका हाती पडल्यावर तिला आधी मनोभावे नमस्कार करावा :)! त्यानंतर आपण कोणते प्रश्न सोडवणार आहोत हे ठरवून त्यावर पेन्सिलने खुणा कराव्यात. ते प्रश्न कोणत्या क्रमाने सोडवणार हे ही ठरवावं, आणि तीन तासाच्या पेपरात दर तासाच्या टप्प्याला आपले किती प्रश्न सोडवून झाले असले पाहिजेत ह्याचाही अंदाज मांडून ठेवावा! ह्या सर्व आदर्श जगाच्या गोष्टी! 
दहावी बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, February 14, 2015

हा खेळ आकड्यांचा!!


 
http://patil2011.blogspot.in/2015/02/blog-post.html 

आकड्याचे  खेळ मोठ मोठे असतात. हा त्या मानाने छोटा खेळ. ह्या वर्षीच्या आता पर्यंतच्या तारखा लक्षात घेऊयात. प्रयत्न असा राहील की 
DD/MM/CCYY ह्या स्वरूपात लिहिलेली आजवरची प्रत्येक तारीख अशी गणिती चिन्हांच्या सहाय्याने अशी लिहावी की DD/MM/CCY ह्या भागातील आकड्यांवर केलेल्या गणिती क्रियेचे उत्तर  शेवटच्या Y इतके येईल. 

01/01/2015
(0
+1
+0
+1)
*2
+0
+1
=
5
02/01/2015
(0
+2)*
(0
+1)
*2
+0
+1
=
5

http://patil2011.blogspot.in/2015/02/blog-post.html

Sunday, February 8, 2015

लेक लाडकी ह्या घरची…

 

http://patil2011.blogspot.in/2015/02/blog-post_8.html 

पूर्वी वाक्य कानावर पडायचं, "पोरीला त्या घरी दिली!" कधी कधी "पोरीला त्या गावात दिली" असंही बोललं जायचं. जणू काही ज्याच्याशी लग्न लागणार तो नवरा मुलगा अगदी नगण्यच असायचा, निर्णयप्रक्रियेत त्याला फारसं महत्त्व नसायचं. बहुदा त्यावेळची परिस्थिती सुद्धा काही प्रमाणात ह्याला कारणीभूत असेल. शेतकरी कुटुंब असेल तर मुलीचं संपूर्ण आयुष्य कसं जाणार हे त्या कुटुंबाच्या जमीनजुमल्यावर अवलंबून असायचं. 
हल्ली असं ऐकायला मिळत नाही. कारणं अनेक! हल्ली लग्न जमविण्याची संधी आईवडिलांना कमी प्रमाणात मिळते. आणि मिळाली तर लग्न मुलाकडे, त्याच्या कर्तुत्वाकडे पाहून मग लग्न जमवलं जातं. फार तर फार त्याच्या आईवडिलांची चौकशी केली जाते. ह्याला कारणीभूत एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हल्ली "पोरीला त्या घरी दिली!" ह्या वाक्यात जे घर अभिप्रेत होतं, अशी घर फार दुर्मिळ झाली आहेत. 
हे घर म्हणजे एक संस्था होती; हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर एक पॅकेज होती. त्यात असायचं घराचं अंगण, घराभोवतीची बाग, घरामागचं तुळशीवृंदावन, विहीर, रहाट, मायेच्या गायी, उन्हापासूनच नव्हे तर संसारातील तापत्या क्षणापासून विसावा देणारा वटवृक्ष! आणि ह्यात सासरची असली म्हणून काय झालं पण प्रेमाची सावली देणारी माणसं असायची. सासू जरी अगदी कडक असली तरी कळत नकळत मायेच्या क्षणाचा शिडकावा करायची! सासरेबुवा शिस्त कधीकधी आपल्या सुनेसाठी थोडी हळवी व्हायची. घरात जर मोठी सून म्हणून प्रवेश केला असेल तर घरची संपूर्ण जबाबदारी अंगावर पडायची. धाकटे दीर अगदी मुलासारखे नसले तरी त्यांची काळजी घेण्याइतपत लहानच असायचे. धाकट्या नणंदा लग्नाच्या असायच्या. त्यांची आणि ह्या मोठ्या वहिनीची छोटी मोठी गुपिते असायची. घरी कामाला असणारे गडी माया लावून जायचे. आता हे सगळं वर्णन काहीसं आदर्श चित्र निर्माण करत आहे हे मान्य! 
ह्यात एक महत्वाचा मुद्दा यायचा. लग्नानंतर नवऱ्याबायकोच्या प्रेमाच्या नात्याला त्या काळात मुक्तपणाचा फारसा वाव लाभला नाही.  ह्या नात्याविषयी ना जास्त बोललं जात असावं ना एकमेकांविषयी असलेल्या प्रेमाच्या अभिव्यक्तीला वाव असायचा. एकंदरीत घरात आलेल्या सुनेच्या आयुष्याचा बहुतांशी भाग हा तिने त्या घरासाठी आणि घरातील कुटुंबियासाठी व्यतीत करावा अशीच अपेक्षा असायची. आणि ह्याच कारणासाठी घराकडे पाहून मुलगी दिली जायची. नवऱ्याशी जुळो वा ना जुळो, तो तर महत्वाचा घटक नाही. पण बाकीचे सर्व घटक जे तिचं बहुतांशी आयुष्य कसं जाणार हे ठरवणार ते चांगले असले म्हणजे झालं अशी विचारसरणी असायची. बाकी मुलीची स्वतःची अशी ठाम मते बनायच्या आधीच अल्पवयात लग्न लावून द्यायचा ह्या मंडळींचा अट्टाहास असायचा.
हल्ली हे घर नाहीसं झालं, फ्लॅट आले. नवऱ्याव्यतिरिक्त ज्यांच्याशी संवाद साधला जायचा अशी दीर, जाऊ, नणंद ही समवयस्क आणि पुतणे, पुतणी, भाचेमंडळी ह्या सर्वांशी संपर्क कमी झाला. जोवर राजाराणीच्या संसारात सगळं काही सुरळीत चाललं असतं त्यावेळी ह्या मंडळींची उणीव सुद्धा भासत नाही; पण जर कुठं काही बिनसलं तर ही सारी मंडळी, आणि आधी वर्णिलेले सर्व घटक मामला एका विशिष्ट मर्यादेच्या पलिकडे न जाऊ द्यायला सहायभूत ठरायचे. आणि हो आधी वर्णिलेल्या गावात अशी किती चांगल्या संस्था म्हणून बनलेली घर आहेत हा घटक सुद्धा टोकाची भूमिका घेण्यापासून मंडळींना थांबवायचा.  म्हणूनच मुलगी कोणत्या गावात दिली हे महत्वाचे!


अजून एक वाक्य आठवलं - सून आणावी ती गरिबाघरची आणि पोरगी द्यावी ती श्रीमंताघरी! हे वाक्याकडे मी आधी फारसं लक्ष दिलं नव्हतं. आज थोडा विचार केल्यावर असं वाटायला लागलं की गरिबाघरची मुलगी संस्काराचे बाळकडू अगदी कोळून प्याली असेल आणि ती आपल्या घरचं संस्कारमय वातावरण कायम ठेवेल ह्याची शाश्वती! आणि आपली मुलगी संस्कारमय घरातील श्रीमंताघरी जाऊन तिथे संस्कारांची पेरणी करेल! तिला लक्ष्मीची काळजी करायला नको! 
गेले ते दिन गेले! ना ती घरे राहिली ना त्या घरांची संस्कृती! ही घरं सोडून आपण प्रगती गाठली. पण प्रगती केवळ एका पिढीत आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच गाठून चालत नसतं. वयाच्या तिशीच्या आसपास प्रगतीची शिखरे गाठलेली पण मग पुढे काय करायचं हे न कळलेली अनेक उदाहरणं पाहायला मिळतात; प्रगतीचा आलेख कमी वेगाने वर गेला तरी चालेल पण आपण गाठलेल्या प्रगतीचा पाया त्या पातळीवर दुसऱ्या पिढीला देता आला पाहिजे! आणि नेमक्या ह्या मुद्द्यावर ह्या घरांची उणीव अधिकाधिक जाणवते!! प्रगती गाठलेला माणूस कदाचित चुकू शकतो पण उंचावलेलं एक घर मात्र पुढची पिढी घडवायला कधीच चुकणार नाही! http://patil2011.blogspot.in/2015/02/blog-post_8.html 

Wednesday, February 4, 2015

सांग सांग भोलानाथ!!

 

http://patil2011.blogspot.in/2015/02/blog-post_5.html

http://patil2011.blogspot.in/2015/02/blog-post_5.html

जानेवारी मध्ये अचानक वाचनात आलं. बहुदा तिसरा किंवा चौथा सोमवार होता तो! वर्षातील सर्वात कंटाळवाणा दिवस म्हणून जाणकार लोकांनी त्या दिवसाची निवड केली होती. त्यामागे अनेक कारणे दिली होती. बरीचशी मला पटली नाहीत. मग मी मला कंटाळा येणारे क्षण शोधावयास लागलो. 
जानेवारी हा नक्कीच सर्वात कंटाळवाणा महिना! माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी तर अधिकच! डिसेंबर महिन्यात सर्व अमेरिकन सहकारी, बॉस वगैरे सुट्टीवर असतात म्हणून कार्यालयात खूप मोकळे (कमी तणावाचे) वातावरण असते. वर्षभर राखून ठेवलेल्या बऱ्याच सुट्ट्या वापरायची संधी मिळते. मुलांच्या शाळेत सुद्धा परीक्षेचा मारा कमी असल्याने त्या पातळीवर सुद्धा मोकळेपणा मिळतो. 


पुढे वाचा 
http://patil2011.blogspot.in/2015/02/blog-post_5.html