Saturday, July 9, 2016

निरोप!

प्रिय वाचकहो!

मी मागील जवळजवळ दोन वर्षांपासुन "साधं सुध" ह्या ब्लॉगवर स्थलांतरित झालो आहे. आपल्यातील काही जण अजुनही ह्या ब्लॉगलाच भेट देत असता, म्हणुन मी "साधं सुध" वर प्रकाशित केलेल्या प्रत्येक पोस्टची लिंक इथं देत असे. परंतु हे काहीसं संभ्रम निर्माण करणारं बनत होतं कारण एकाच पोस्टच्या दोन लिंक दोन ब्लॉगवर प्रकाशित व्हायच्या. ह्या कारणास्तव ह्या पुढे मी फक्त  "साधं सुध" वर माझ्या पोस्ट्स प्रकाशित करत राहीन. 

आपण गेले सहा वर्षाहून अधिक कालावधीत मला आणि ह्या ब्लॉगला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार !

आदित्य पाटील 

साधंसुध ची लिंक - साधंसुध


Saturday, July 2, 2016

"मेसी" क्षण !





ह्या आठवड्याची सुरुवात काहीशी निराशाजनकच झाली. सकाळी साडेपाचला अर्जेंटिना आणि चिली ह्यांचा सामना पाहण्यासाठी उठू पाहणाऱ्या सोहमला साडेसहा वाजता उठण्यास तयार करण्यास मी यश मिळविलं. मध्यंतरानंतरचा सामना पूर्ण पाहता येईल ह्या गोष्टीवर तो तयार झाला. पण सामना मात्र पुर्ण वेळेत आणि त्यानंतरच्या अतिरिक्त वेळेत सुद्धा गोलशुन्य बरोबरीत राहिला. सोहम स्कुल बसला गेला आणि पेनल्टी शूटआऊटमध्ये मेसीची पहिलीच किक गोलपोस्टच्या बाहेर गेली. पुढे अर्जेंटिना हा कोपा अमेरिका स्पर्धेचा अंतिम सामना हरली. 

बार्सिलोनातर्फे क्लब पातळीवर खेळताना अगदी अविस्मरणीय यश मिळविणाऱ्या मेसीचा अर्जेंटिनातर्फे खेळताना महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील चौथ्या महत्वाच्या अंतिम सामन्यातील हा पराभव! आपल्या देशाला सर्वोत्तम बहुमान मिळवून देण्यात अपयश आल्याचं शल्य मेसीच्या हृदयात आधीपासुन होतंच; त्यात रविवारी आपली पेनल्टी किक चुकल्याचं दुःख त्याला अगदी हताश करुन गेलं आणि त्यानं तडकाफडकी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन निवृत्ती पत्करली. हा तो "मेसी" क्षण ! 
 
http://patil2011.blogspot.in/2016/07/blog-post.html 

शिखरमार्ग !


"जया अंगी मोठेपण तया यातना कठीण" अशी मराठीत उक्ती आहे. व्यावसायिक जगात वावरताना अशा काही उच्चपदस्थ व्यक्तींना पाहताना किंवा त्यांच्याविषयीची पुस्तकं वाचताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलु जाणवले त्याविषयीची आजची ही पोस्ट! 


१) दीर्घ दिनचर्या - 
हल्ली सर्वच क्षेत्रात दीर्घ वेळ काम करावं लागतं. इतकंच नव्हे तर काही जणांना विविध शहरांत, देशांत सतत प्रवास करावा लागतो. बहुतेक वेळा दीर्घ प्रवासानंतर इच्छित स्थळी पोहोचल्यावर तात्काळ आपल्या कामास किंवा अगदी महत्वाच्या मिटिंगला सुरुवात करावी लागते.  तिथं वेगळ्या प्रकारचा आहार मिळतो त्यास सुद्धा जमवुन घ्यावं लागतं. ह्या सर्व बदलत्या परिस्थितीचा मुकाबला करताना ज्यावेळी प्रत्यक्ष कामास सुरुवात होते त्यावेळी तुम्ही आपली सर्वोत्तम कामगिरी सादर करावीत अशी अपेक्षा असते. 
 
http://patil2011.blogspot.in/2016/06/blog-post_26.html 

सैराट - एक विश्लेषण !







बहुतांशी सर्वसामान्य माणसं दोन विचारसरणीने जीवन जगत असतात. 

पहिली विचारसरणी (धोपटमार्गाने वाटचाल) - त्यांच्या जीवनाचा बराचसा भाग हा आपल्या चरितार्थाची सोय लावण्यात व्यापून गेलेला असतो. लहानपणापासुन आईवडील त्यांना लवकरात लवकर आपल्या पायावर उभा राहायला शिक असं सांगुन त्यांच्या मतीनुसार शिस्तीतल्या जीवनाचा स्वीकार करण्याचा उपदेश करीत असतात. ह्या विचारसरणीनुसार वागताना विशिष्ट वयात शाळा पास होणे, नोकरीधंद्याला लागणे, आई वडिलांनी निवडलेल्या साथीदाराशी लग्न करणे, पुढे पालक म्हणुन मुलांचे संगोपन करणे, मग आदर्श आजी आजोबा बनणे, भजनाला जाऊन बसणे असा मार्ग साधारणतः सांगितला जातो.  
 
http://patil2011.blogspot.in/2016/06/blog-post_19.html