Wednesday, December 30, 2015

भावनाकल्लोळ!

 

http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_30.html 

  आयुष्यात पंचविशी - तिशीपर्यंत कसा अगदी उत्साहपूर्ण काल असतो. आपल्याजवळ आयुष्यात भव्य दिव्य करण्यासाठी अगदी अफाट वेळ आहे अशी भावना मनात व्यापून राहिलेली असते.त्यामुळे एक विशिष्ट मार्गच धरून ठेवायला पाहिजे असला विचार क्वचितच मनात येतो. त्यामुळे ह्या कालावधीत मनाला आवडतील असे निर्णय घेतले जातात. थोड्या कालावधीत एखादा निर्णय न आवडल्यास त्याहून पूर्णपणे वेगळा असा दुसरा निर्णय सुद्धा घेतला जातो. पण त्यानंतर सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत आयुष्याच्या तिशीच्या आसपास किंवा विवाहानंतर काहीसा बदल घडून येतो. माणसाचे प्रथम प्राधान्य हळूहळू स्थैर्याच्या शोधाकडे वळत जातं. काही कलंदर लोक असतात ती आयुष्यभर आपल्या मर्जीने वागत राहतात.http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_30.html 

केळीचे सुकले बाग

 

http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_28.html

एखाद्या बाह्यरूपाने सुखी दिसणाऱ्या संसारात अंतर्मनाने दुःखी असणाऱ्या स्त्रीची व्यथा सांगणारं हे गीत आहे हे सांगण्यासाठी कोण्या विद्वानाची गरज नाही. स्त्रीला सुखी ठेवण्यासाठी केवळ तिला घर, पैसा, कपडालत्ता देऊन भागत नाही तर तिच्या मनाला समजून घेणारा साथीदार हवा असा हा ह्या गीताचा आशय! 


पुढे वाचा 

http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_28.html 
 

Saturday, December 26, 2015

वारसदार - अंतिम भाग

 
 http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_26.html

कुलकर्णीनी आपलं मित्तल संशोधन अभियान मोठ्या जोरात चालूच ठेवलं होतं. ह्यात पुरावे तसे मिळत होते पण असल्या पुराव्यांविरुद्ध वर्षोनुवर्षे खटले चालू ठेवण्याची क्षमता मित्तल बाळगून असणार ह्याच्याविषयी कुलकर्णी आणि राव ह्यांच्यात एकमत होतं. त्यामुळे त्यांना शोध होता एखाद्या अगदी ठोस पुराव्याचा! गेले काही दिवस हे दोघं रावांच्या घरी बसूनच उपलब्ध कागदपत्रांचा अगदी बारकाईने तपास घेत होते. सुशांतदेखील सध्या बंगलोरात असल्याने त्यांना वेळेचं कसलंच बंधन नव्हतं. 

http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_26.html 

कट्यार काळजात घुसली!!

 

http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_19.html


चित्रपट निव्वळ अप्रतिम! ह्या चित्रपटाचं सौंदर्य अनेक निकषांवर खरं ठरणारं ! चित्रपटातील वातावरणनिर्मिती ज्याप्रकारे केली ते सुंदर आणि चित्रपटातील प्रत्येक फ्रेममध्ये जे एक सुसंस्कृत वैभव / श्रीमंती दाखवली गेली ती मनाला मोहवून गेली. चित्रपटाचा आरंभच "सूर निरागस होवो गणपती" ह्या शंकर महादेवन ह्यांच्या अप्रतिम गीतानं होतो. ह्या गीताचे सुरेल सूर कानात साठवावेत की की त्या सुंदर नृत्याला आणि श्रीमंती वैभवाला नयनात साठवून घ्यावं हा पडलेला प्रश्न!

पुढे वाचा 


http://patil2011.blogspot.in/2015/12/blog-post_19.html