निवेदन
ही कथा अचानक आटोपती घेतोय. मागचे काही भाग मनासारखे झाले नाहीत. कथानकातील रंगत काही वाढली नाही. वाचकसंख्या कमी होऊ लागली. एकंदरीत संदेश लक्षात घेऊन ही कथा / किंवा हे पर्व आज संपवतोय. पूर्ण कथा काही लिहित नाहीये. पण पुढील प्रमुख घटना अशा!
- आश्लेषा आणि संपत ह्यांची जुनी मैत्री भाऊरावांना समजते. तिला विपर्यस्त रूप देण्याचा ते आणि त्यांचे हस्तक प्रयत्न करतात. त्यामुळे संपतरावांच्या संसारात थोडे वादळ निर्माण होते. आपल्या मुलीच्या संसाराला वाचवायला विश्वासराव पुढे सरसावतात. भाऊरावांना ते वेळीच आवरतात.
- जाधवांचे फासे हळू हळू भाऊरावाभोवती पडतात. शेवटचा प्रयत्न म्हणून भाऊराव विश्वासरावांना त्यात अडकवायचा निष्फळ प्रयत्न करतो. त्यात यश न आल्याने भाऊरावास तुरुंगात जावे लागते.
- संपतराव अपेक्षेनुसार निवडणूक जिंकतो.
- निवडणुकीत कोणत्याही पक्षास निर्णायक बहुमत मिळत नाही. तरुण संपतरावांना आणि १० आमदारांच्या एका गटास फोडण्यास अण्णासाहेबास यश येते. ह्याचे पारितोषिक म्हणून संपतरावाचा मंत्रिमंडळात आश्चर्यकारकरित्या समावेश होतो. आणि अशा प्रकारे ह्या पर्वाचा गोड शेवट होतो.
- कथेचा मुख्य बिंदू जिथे भाऊरावांच्या हस्तकांकरवी विजयरावांचा अपघाती खून होतो हे फारसे काही पटण्याजोगे नव्हते.
- कथेत रहस्य निर्माण करण्यात अपयश आले. सर्व काही कथेत आधीच अप्रत्यक्षपणे सांगून टाकण्यात आले.
- राजकीय वातावरणाची खोलवर निर्मिती करण्यात अपयश आले.
- पक्षाचे युवा नेते मुकुल ह्यांच्या आशीर्वादाने संपतराव पुढे येतात. १० वर्षात मुख्यमंत्री आणि अजून ५ वर्षांनी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होतो. दुसर्या पर्वात ह्याचे वर्णन असू शकते.
No comments:
Post a Comment