Sunday, February 9, 2014

Invest, Divest की Decommission


पुन्हा व्यावसायिक जगाचा संदर्भ घेऊन लिहिलेला हा ब्लॉग! खरतरं तपोवन अर्धवट सोडल्यापासून कोणतीही  कथा लिहिताना मध्ये दुसऱ्या विषयाला हात घालायचा नाही हा केलेला निर्धार आता मोडतोय. तर व्यावसायिक जगात Invest वा Divest ह्या विषयावर चर्चेत हल्ली हल्ली बऱ्याच वेळा सहभागी व्हावे लागले. एखादी अस्तित्वात असलेच्या कार्यप्रणालीच्या  (आता application ह्या शब्दासाठी कार्यप्रणाली हा योग्य शब्द की नाही हा वादाचा मुद्दा!) भवितव्याच्या संदर्भात Invest वा Divest ह्या पैकी एक धोरण स्वीकारण्याची पद्धती आली आहे. ह्यात अजून पुढची पातळी म्हणजे Decommission! आता ह्यांचा थोडा शोध घेवूयात!
१> invest - एखादी कार्यप्रणाली सध्या चांगल्या प्रकारे काम करतेय आणि तिचं एकंदरीत स्वरूप भविष्यातील आपण रेखाटलेल्या चित्राशी सुसंगत आहे. मग ती कार्यप्रणाली invest (गुंतवणूक) ह्या प्रकारात मोडते. म्हणजे ह्या कार्यप्रणालीला काळाशी सुसंगत ठेवण्यासाठी तिच्यावर खर्च करणे योग्य समजलं जातं.
२> Divest - एखाद्या कार्यप्रणालीला सध्या दुसरा पर्याय उपलब्ध नाही. पण भविष्यात ही कार्यप्रणाली काळाशी सुसंगत ठरणार नाही ह्यात वाद नाही. मग त्या कार्यप्रणालीला जैसे थे ह्या स्वरुपात ठेवून द्यायचं. ह्याला divest असे म्हटले जाते
३> Decommission (बाद) - ज्या कार्यप्रणालीच्या बाबतीत Divest हा पर्याय निवडला जातो तिला  काळाच्या ओघात दुसरा एखादा पर्याय सक्षम बनतो आणि मग त्या कार्यप्रणालीचे decommission करावे लागतं म्हणजे तिचा कारभार बंद! ह्यात ही कार्यप्रणाली चालू ठेवण्यासाठी लागलेल्या काही खर्चाची बचत होत असल्याने हा पर्याय लवकरात लवकर निवडण्याकडे  कंपन्यांचा कल असतो.
आता बऱ्याच वेळा हे पर्याय नकळत निवडले जात असतात. परंतु काही कंपनीच्या बाबतीत पुढील धोरण अगदी सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ ठेवण्याची पद्धत आहे त्यामुळे तिथे प्रत्येक कार्यप्रणालीच्या बाबतीत हा निर्णय घ्यावा लागतो.
आता ब्लॉगचा मूळ मुद्दा! ही तीन धोरणे आपण सुद्धा कळत नकळत (बहुदा नकळतच) आपल्या जगण्यात वापरत असतो.
१> आपल्या अवतीभोवतीच्या लोकांच्या बाबतीत - काही लोक आपल्याला मनापासून आवडतात, त्यांच्या बाबतीत आपण invest ह्या धोरणाचा वापर करतो. त्यांच्यासाठी आपण आपला वेळ काढतो, त्यांना बरे वाटेल असे वागतो. हे सर्व का? तर ही माणसे आपल्याला बरे वाटून देतात म्हणून!
आजूबाजूची काही माणसे; त्यांच्याशी खरे तर आपले पटत नाही, ती आपल्याला मनःस्ताप देतात. पण त्यांच्यापासून सुटका करून घेण्याचा सध्यातरी पर्याय नसतो. मग आपण त्यांच्या बाबतीत divest हा पर्याय वापरतो.
divest मधली काही माणसे, जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा त्यांना आपण आपल्या जीवनातून decommision (बाद) करून टाकतो. किंवा काही माणसे इतकी त्रासदायक असतात कि दुसरा पर्याय नसला तरी आपण त्यांना divest ही  मधली पायरी वगळून थेट बाद करून टाकतो.
२> तसेच आपल्या जीवनाच्या बाबतीत! पैसा, आपलं करियर ह्यासाठी आयुष्याच्या कोणत्या टप्प्यापर्यंत invest करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न! प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हातरी स्वानंद हा पर्याय अचानक येऊन उभा ठाकतो! काहींना हा पर्याय उभा आहे हे समजत तरी! काही अभागी जीवांना तर हा पर्याय समोर असला तरी  कळत नाही. काहींना कळतो परंतु स्वानंदासाठी आपल्या आयुष्याची दिशा ठरविण्याइतके ते सुदैवी नसतात. आयुष्य त्यांना ही संधीच देत नाही.
प्रत्येक मोकळा क्षण ज्यावेळी येतो त्यावेळी हे वेगवेगळे पर्याय आठवतात! ऑफिस दुपारी एकचे, सकाळी जो काही मोकळा वेळ मिळतो त्यात ऑफिसच्या बाकी राहिलेल्या कामाचा उरक पाडायचा कि ब्लॉग लिहायाचा हा सतत मनाला छळणारा प्रश्न!
हल्ली आम्ही वसईच्या न्यू इंग्लिश स्कूलची मुले आपल्या शालेय जीवनातील मनोहर आठवणींना उजाळा देण्याच्या कार्यात invest करून बसलो आहोत. कशासाठी तर स्वानंदासोबत शाळेचे पूर्वीचे रूप मिळवून देण्यासाठी!
काही गोष्टी कशा मनातल्या मनात असलेल्या बऱ्या नाही का? त्या अशा उघडपणे मांडून त्यांचं विश्लेषण केले की कसा थोडा त्रास होतो काहीसं निष्ठुर, मतलबी बनल्यासारखं वाटतं!

No comments:

Post a Comment