दिनांक - २०१४ मार्च
नाही, नाही! शीर्षक वाचून आमच्याकडे कोणी दहावीच्या परीक्षेला बसले आहे असा समज बिलकुल करून घेवू नका. सोहमची सीबीएसई बोर्डाची इयत्ता चौथीची परीक्षा सुरु होतेय आज! आणि आम्ही सर्वजण त्याच्या तयारीत गुंतलो आहोत. विषयाची यादी ह्याप्रमाणे
मुख्य विषय
इंग्लिश
हिंदी
गणित
विज्ञान
सामाजिक शास्त्र
संगणक
छोटे विषय
मराठी
जनरल नॉलेज
मुल्य शिक्षण (Value Education)
एकूण वर्ष तीन सत्रात विभागलेले असते. ह्या तीन सत्रात सुद्धा प्रत्येकी दोन परीक्षा असतात. पहिली संगणकाधारित - वस्तुनिष्ठ प्रश्नांची! आणि दुसरी मुख्य परीक्षा! एक सत्र कसेबसे तीन महिन्याचे, त्यात ह्या दोन परीक्षा! मुख्य परीक्षेच्या आधी एक आठवडा त्याची सराव परीक्षा आणि प्रोजेक्ट! एकंदरीत, दर महिन्यात परीक्षेचा हाहाःकार! एक मात्र बरे, नवीन पिढीतील सोहम आणि त्याची मित्रमंडळी ह्या परीक्षा प्रकाराविषयी जास्त काही दडपण घेत नाहीत. सोहमला परीक्षेचे दडपण येत नाही ह्याचे पूर्वी मला दडपण येत असे ! पण हल्ली मला कळून चुकले की मनुष्यजात उत्क्रांतीचे नवनवीन टप्पे गाठत आहे त्यामुळे बहुदा हल्लीच्या युगात वावरण्यासाठी योग्य अशी दडपण न घेणारी पिढी आता निर्माण झाली असावी!
आता आपण सोहमच्या अभ्यासक्रमाकडे पाहूयात! एक लक्षात ठेवा हा तिसऱ्या सत्रातील दुसऱ्या परीक्षेचा अभ्यासक्रम आहे! म्हणजे एकंदरीत वर्षाचा एक सष्टांश (१/६) भाग!
इंग्लिश -
मुख्य पुस्तक
The Wonderful Tea Kettle
The Violet
A Man's Club
A Wolf's Cub
ह्यातील वानगीदाखल एक प्रश्नोत्तर!
Describe the badger's performance.
Answer - The tinker dressed up in colorful clothes, with a big fan in his hand, came out on the platform. He made a polite bow and set the wonderful tea-kettle on the stage. At the wave of his fan, the kettle ran around on four legs, half badger and half kettle, clanking its lid and wagging its tail. How the children shouted! Next it turned into a badger, swelled out its body and beat a tune on it like a drum. It danced on the tight rope and walked the slack rope, holding a fan or an umbrella in its paw, stood on its head, and finally at a flourish of its master's fan became a cold brass tea-kettle again.
व्याकरण - १
Verb Like Adjective
The Merchant of Seri
Homophones and Irregular Verbs
Uses of Simple Present Tense
auxiliary will
व्याकरण - २
Prepositions
conjunctions
Proverbs
Comprehension C
Writing Skills - Formal Letter, Messages
हिंदी (शुद्धलेखन चूकभूल द्यावी घ्यावी!)
चतुर चरवाहा
डरना कभी न जाना
कौन जीता
बुद्धिमान बगुला
बाँकी बाँकी धुप
पिटारे में कुछ और!
अधिक व्याकरण
गणित
काळ (Time)
Money
विज्ञान
Force, Work and Energy
Air, Water and Weather
Our Environment
एक उदाहरण
Write a note on radioactive pollution
Radiation is an invisible pollutant that can be highly dangerous. Some radiation reaches the earth from the sun and outer space. Larger amounts come from radioactive materials like fallout from nuclear weapons and waste material from nuclear power plants and other electronic devices. Exposure to large amounts of radiation causes cancer in human.
सामाजिक शास्त्र
Soils of India
Our Water Resources
Our Mineral Resources
They showed us the way!
आता मध्यप्रदेशात एखाद्या ठिकाणी बॉक्साईट (चूकभूल द्यावी घ्यावी) मिळत असेल ते लक्षात ठेवायचे आणि पुन्हा ते ठिकाण नकाशात नक्की कोठे आहे हे ही दाखवायचं हे कठीण काम ह्या बिचाऱ्या मुलांना करावं लागतं!
संगणक
Kid Pix - ह्या सॉफ्टवेअर संबंधित प्रात्यक्षिक आणि प्रश्नोत्तरे!
आता हे सॉफ्टवेअर ही मुले आरामात वापरू शकतात . परंतु त्यावर प्रश्नोत्तरांचा पेपर आवश्यक का आहे हे मला कोणी समजवून सांगेल काय? जसे की टास्कबार वर कोणते आयकॉन आहेत हे मुलांनी का बरे लक्षात ठेवावे?
छोटे विषय
मराठी
पावसाची मजा
फळांची मेजवानी
आवडता खेळ
मराठी वर्णमाला
माझे घर
जनरल नॉलेज (GK)
एका पानाचे १८ धडे ह्यात प्रत्येक राज्याच्या नृत्य, इंग्लिश साहित्यातील इतिहास, ते भगतसिंग ह्या चित्रपटात त्यांची भूमिका कोणी (अजय देवगण) ह्याने साकारली. असे प्रत्येकी ७ -८ प्रश्न!
मुल्य शिक्षण (Value Education)
प्रत्येक मूल्य उदाहरणासकट समजवून देणारा एक धडा आणि त्यावरील प्रश्नोत्तरे!
सारांश
कोठेतरी काहीतरी मोठ्या प्रमाणात चुकतेय! मागची पिढी मराठी माध्यमातून वरील उल्लेखलेल्या अभ्यासक्रमापेक्षा बराच कमी अभ्यास करून बाहेर पडली आणि बऱ्यापैकी टिकली. ह्या पिढीला प्रश्न उदभवतो तो अगदी उच्चपदाच्या नजीक आल्यावर ती शेवटची पायरी ओलांडायला! परंतु त्यावर हा असा उपाय नक्कीच नाही! सतत परीक्षांचा मारा ह्या वयातील मुलांवर करणे किती योग्य आहे? आमचे तत्व आहे की शिकवणी लावायची नाही त्यामुळे अजूनही आम्ही धडपडत त्याचा अभ्यास घेतो! त्याची काही उत्तरे त्याला बरे वाटावे म्हणून आम्हीही पाठ करतो!
सत्य एकच आहे! आपण व्यवसायाभिमुख शिक्षणपद्धतीची निर्मिती करण्यात सपशेल अयशस्वी ठरलो आहोत. त्यावर उपाय म्हणून आपण दहावीपर्यंत मुलांना सर्व शाखांसाठी तयार करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पालकांना एकच सल्ला - स्वतःला त्या मुलांच्या जागी ठेवून पहा! एखादा विषय, त्यातील प्रश्नोत्तरे स्वतःला पाठ करता येतील कि नाही हे स्वतःला विचारून पहा. उत्तर जर नाही असेल तर मुलावर त्याची सक्ती करू नका! शेवटी तो तुमचा मुलगा / मुलगी आहे! परवाच सराव परीक्षेला सोहमला नकाशावरील प्रश्न - खनिजे आढळणाऱ्या ठिकाणाचे नकाशातील स्थान दाखवा हा ५ गुणांचा प्रश्न होता. गुगलच्या युगात हे पाठ करण्याची गरज नाही हे आमचे मत त्यामुळे त्याला ह्या प्रश्नांचे दडपण न घेण्याचा सल्ला आम्ही दिला!
असो परीक्षा आज सुरु झालीयं! आम्हांला आणि सोहमसोबत त्याच्या सर्व मित्रमंडळी, त्यांच्या पालकांना तुमच्या शुभेच्छांची गरज आहे!
All the best to Soham and his parents
ReplyDeleteमाझी मुलगी सृष्टी सॆबॆएसॆ बोर्ड तिसरीला आहे. आमच्याकादेपण सेम परिस्थिती आहे.
ReplyDeleteसोहमला शुभेछया, एस एस सी असो की सी बी एस इ
ReplyDeleteसगळी कडे सारखीच परिस्थिति. आमच्या कडे
दहावीची धामधूम आहे.