Friday, June 12, 2015

सुज्ञता !!

 
 http://patil2011.blogspot.in/2015/06/blog-post_13.html

हळूहळू वयाने मोठेपण येत जातं. जर तुमच्यासोबत एखाद्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मुलांना लाभतं इतकं सुदैव असेल तर तुम्हांला महाविद्यालयीन शिक्षण संपेपर्यंत मुत्सद्दीपणा अंगी बाणवायची गरज भासत नाही. नाही म्हणजे तुम्ही ह्या काळात प्रेमात वगैरे पडलात तर मात्र काहीसा मुत्सद्दीपणा बाणवावा लागतो. एकदा का तुम्ही नोकरीला लागलात आणि तुमचं लग्न झालं की तुमच्या आयुष्यात अनेक नवीन लोक प्रवेश करतात. शिक्षणाचा कालावधी संपेपर्यंत तुमच्या आयुष्यात आलेली लोक आणि त्यानंतर आलेली लोक ह्यात एक मुलभूत फरक असतो. पहिल्या टप्प्यातील लोक एकतर लहानपणापासून तुम्हांला ओळखत असतात आणि दुसरं म्हणजे तुमच्याशी त्यांची व्यावसायिक स्पर्धा नसते. त्यामुळे ह्या टप्प्यात तुम्हांला तुमच्या मुलभूत अवतारात वागणं बऱ्यापैकी शक्य असते. नंतर मात्र आयुष्य क्लिष्ट होतं जातं. कार्यालयात तुम्ही व्यावसायिक यशाच्या शिड्या झपाट्याने चढून जाण्यासाठी आजूबाजूच्या लोकांशी प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या स्पर्धा करीत असता. आपण ज्या कंपनीसाठी काम करतो तिच्या भल्यासाठी काम करणे हे आपल्या सर्वांचे समान ध्येय असलं तरी त्यात स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याच्या अनेक संधी उपलब्ध असतात. 

http://patil2011.blogspot.in/2015/06/blog-post_13.html 

No comments:

Post a Comment