गेल्या दोन वर्षातील कोरोनामुळे प्रवासावर आलेल्या निर्बंधांमुळं अमेरिकेतील ऑफिसात जाणं झालं नाही.  जसजसे मागील वर्षी प्रवासावरील निर्बंध उठू लागले तेव्हा हळूहळू हैदराबाद कार्यालयात फेऱ्या सुरू झाल्या.  जून महिन्यात अमेरिकेतील ऑफिसमध्ये अमेरिकेतील विविध कार्यालयांत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना एका विशिष्ट प्रशिक्षणासाठी नेवार्क  डेलावेअर येथील ऑफिसात बोलावण्यात आले होते. मी सध्या जी भूमिका बजावत आहे त्या अनुषंगानं या प्रशिक्षणाच्या निमित्ताने मीही तिथे गेलो. या दौऱ्यातील काही महत्त्वाची महत्त्वाच्या नोंदी आणि त्या अनुषंगानं  आलेली काही छायाचित्रं असं ह्या पोस्टचे स्वरूप असणार आहे. 
परदेश दौरा म्हटला की तुमच्या बॅग्सचे पॅकिंग हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो.  जर आपण नियमित परदेश प्रवासाला जात असाल तर आपण याबाबतीत काहीसे सुसज्ज असता. परदेश प्रवासासाठी आवश्यक असणारी यादी आपल्याकडे सदैव तयार असते.  अनुभवी माणसं केवळ पाच-सहा तासात परदेश प्रवासासाठी लागणाऱ्या बॅग्स भरतात असं ऐकिवात आहे. मी याबाबतीत पूर्णपणे माझ्या पत्नीवर अवलंबून आहे!
संपूर्ण पोस्ट वाचण्यासाठी 
 
No comments:
Post a Comment