Showing posts with label पर्यावरण. Show all posts
Showing posts with label पर्यावरण. Show all posts

Tuesday, March 30, 2010

पर्यावरण

आधीच्या एका blog मध्ये मी आपल्या समाजातील असंयमी वृतीविषयी थोडक्यात बोललो. आज त्याविषयी जरा विस्ताराने बोलूया. आपण सर्वच ठिकाणी पूर्ण फायदा मिळवण्याची वृत्ती बाळगतो. पुढील पिढीसाठी थोडे काही राखून ठेवावे असा जो विचार विकसित देशांमध्ये दिसतो त्याचा पूर्ण अभाव आपल्या मध्ये आहे. शेती वाडीचे जे काही थोडे तुकडे बाकी होते ते आपण development च्या नावाखाली विकून मोकळे होतो. IT कंपनी मध्ये आपली ESTIMATES दिवसाचे १२ तास गृहीत धरून केली असतात. २ तासाचा चित्रपट २ तासाच्या जाहिरातीसोबत ४ तासाचा बनवला जातो. समुद्रातील रेती उपसून काढणे, टेकड्या फोडून त्यातील दगडे काढणे, रस्ते वाढविण्यासाठी झाडे तोडणे, इमारती बांधून त्यांचे सांडपाणी नैसर्गिक जलाप्रवाहात सोडणे हे सर्व उद्योग आपण development च्या नावाखाली करतो.
CLOCK IS TICKING FAST . आपण पर्यावरणाच्या विनाशाकडे झपाट्याने चाललो आहोत. जबाबदार आहोत आपण सर्व, आपली नोकरी सांभाळत BLOG लिहिणारा आदित्य पाटील देखील! आपण जबाबदार आहोत ते आपल्या निष्क्रीयतेबद्दल ! गरज आहे ती एका मोठ्या सामाजिक चळवळीची पण त्यासाठी सर्व पाश तोडून मुक्त होण्याची गरज आहे आणि तिथेच आपण सर्व कच खातो. तर मग सर्वजण प्रेषक बनून बघत बसुया आपली पुढील वाटचाल!