पूर्वी भावना खूप घन पण शब्द मोजके असायचे. भावना व्यक्त करावी ती डोळ्यातून किंवा कृतीतून. भावना तशा संवेदनशील असतात, त्यांना फुरसतीचे क्षण लागतात, आठवणीचा मनोरा लागतो. हल्ली जमाना बदलला. भावनांना जपायला, जोपासायला बऱ्याच वेळा संधीच मिळत नाही. भावनांना व्यक्त करायला शब्दांचा प्रमाणाबाहेर आधार घेतला भावनांचा गाभा कोठेतरी हरवतो.
माणूस सुदैवी असेल तर जन्मतः त्याच्याभोवती कोडकौतुक करणाऱ्या नातेवाईकांचे कोंडाळे असते. प्रत्येकाच्या नशिबानुसार कोडकौतुक आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यापर्यंत साथ देतात. आईला तर आपला साठीला पोहोचलेला, निवृत्त झालेला मुलगा सुद्धा लहानच वाटत असतो. आयुष्यात लग्न ही घटना माणसाच्या आयुष्यात मोठे बदल घडवून आणते. पूर्वी हे बदल फक्त स्त्रियांच्या आयुष्यात घडायचे परंतु हल्ली विभक्त कुटुंबात पुरुषांना सुद्धा ह्या बदलांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागते.
कितीही मोठे झाले तरी मनुष्याच्या मनाचा एक कोपरा कोठेतरी कौतुकाच्या / लाडाच्या अपेक्षेत असतो. हे कौतुक क्षणभराचे असले तरी त्याला पुरते. लग्नानंतर सुरुवातीचा नाविन्याचा काळ संपला की मग कसोटीचा काळ सुरु होतो. प्रत्येक जोडीदाराला स्वतःच्या समस्या तर असतातच. पण काही क्षण ह्या समस्या, त्यांचा विचार बाजूला ठेवून जोडीदाराला विशेष वाटून द्यायची गरज असते. हे क्षण शोधले तर सापडतात!
सकाळचा चहा हा असाच एक क्षण! दिवसभर घरातील कामाचा रगडा उरकणाऱ्या गृहिणीला सकाळी उठल्यावर हातात चहाचा कप मिळाल्यास तिला आपल्या कामाची दाद देणारा साथीदार लाभला आहे ही भावनाच सुखदायक असते. स्त्रिच्या हृदयाची योग्य तार छेडल्यास ती संसाराला स्वर्ग बनवू शकते. सकाळी पतीने बनविलेल्या चहाचे घुटके घेत घेत ती दिवसभराच्या कामाचे नियोजन करीत असते. हुशार नवरे चहातून निरोपही पाठवत असतात, कधी चहात साखर कमी असते तर कधी जास्त. दुधाचे योग्य (पत्नीला) आवडणारे प्रमाण जमणे महाकठीण. काही कुटुंबाचा हा चहा विविध शहरात, विविध हवामानात झालेला असतो. कधी थंड हवेच्या प्रदेशात सात वाजताच्या किट्ट अंधारात झालेला असतो तर उन्हाळ्यात पाच वाजताच्या फटफटीत प्रकाशात! पतीचे आई वडील घरी आले असताना चहा करणारा पती पाहून पत्नी धन्य होते तर पतीची आई धन्य होते की नाही हे तिला हा चहा मिळाला की नाही ह्यावर अवलंबून असतं.

हा झाला जोडप्यांचा एक प्रकार! दुसऱ्या प्रकारात नवऱ्याचं प्रेम त्यांच्या पत्नीवरील मालकीहक्काच्या भावनेतून प्रदर्शित होत असतं. पत्नीने केलेला सकाळचा फक्कड चहा पतीला जितका आनंद देतो तितकाच किंबहुना त्यातून अधिक आनंद त्याच्या चेहऱ्यावरील भाव बघत चपातीचे पीठ मळणाऱ्या पत्नीला मिळतो. असा हा सकाळचा चहा!
No comments:
Post a Comment