Saturday, May 1, 2010

माहिती आणि तंत्रज्ञान - धाडसी प्रयत्न

महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वाना माझ्यातर्फे शुभेच्छा !. आज मी एक धाडसी प्रयत्न करून बघणार आहे आणि तो म्हणजे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील माझे थोडेसे ज्ञान / अज्ञान तुमच्यासमोर संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा!

या क्षेत्राचे पुढील मुख्य भाग आहेत. हे सर्व मी बँकेच्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करतोय.
१> Database - माहिती भांडार.
बँकेच्या सर्व ग्राहकांची माहिती ह्या ठिकाणी साठवून ठेवली असते. Database हा विविध प्रकारे साठवला जाऊ शकतो. IMS, DB2, Oracle ही काही उदाहरणे होत. Database मधील माहिती दोन प्रकारे बदलली जाऊ शकते.

अ> Batch Process - या प्रकारात बर्याच खात्यावर एक विशिष्ठ प्रकिया एकाच वेळी apply केली जाते. ह्याची उदाहरणे द्यायची झाली तर मासिक व्याज सर्व खात्यांमध्ये जमा करणे हे होय . बँकेच्या कॉम्पुटर प्रोग्रामची साखळी ही माहिती भांडारावर run केली जाते. माहिती भांडाराच्या आकारमानानुसार ह्या प्रक्रियेस कित्येक तास लागू शकतात. ही प्रक्रिया चालू असताना online स्क्रीन च्या वापरात थोडासा संथपणा जाणविला जाण्याची शक्यता असते.

ब> Online Process - या प्रकारात माहिती भांडार हे लगोलग update होते. या साठी screen वापरल्या जातात. या screen वर जाऊन user त्याला / तिला हवे असलेले बदल करतो. या स्क्रीन वापरण्यासाठी प्रत्येकाकडे स्वतःचे online account आणि त्याचा password असणे आवश्यक असते. ही माहिती सुरक्षित ठेवणे अत्यंत गरजेचे असते आणि चुकीच्या माणसाच्या हाती ही माहिती पडल्यास त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो.

या screen मध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत

I > ग्राहकांद्वारे माहिती बदलली जाणे - INTERNET द्वारे आपण वेब साईटवर जाऊन आपली स्वतःची माहिती (पत्ता, वेतन इत्यादी) बदलणे किंवा ज्यावेळी आपण ATM मधून पैसे काढतो त्यावेळी माहिती भांडारातील आपली जमा रक्कम कमी होणे.

II> Administrator Updates - काही प्रक्रिया करण्याचे हक्क सर्व सामान्य ग्राहकांना देणे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शक्य नसते अशा वेळी बँकेचे विशिष्ट अधिकार्यांनाच या screen वापरण्याचे अधिकार दिले जातात. उदाहरण द्यायचे झाले तर एखादे खाते गोठवणे!

२> कॉम्पुटर प्रोग्राम्स (अर्थात संगणक आज्ञावली)
Batch Process असो कि online process असो, आतल्या आत (background) संगणक आज्ञावली run होते. ही संगणक आज्ञावली स्क्रीन वरील माहिती किंवा batch process मधील business rules माहिती भांडारावर apply करते. संगणक आज्ञावली ही विविध भाषांमध्ये लिहिली जाऊ शकते. Cobol, Java ही काही भाषांची उदाहरणे होत.

३> Networking (अर्थात संगणकीय जाळे)
सर्व अधिकृत संगणक हे माहितीभांडाराशी सतत जोडले असणे आवश्यक आहे. Networking द्वारे हे साध्य होते.

वरील दिलेल्या तीन भागांची मिळून एक Computer System बनते ज्यावर मोठमोठ्या कंपन्यांचा कारभार चालतो. ह्या Computer System देखील दोन भागात विभागल्या जाऊ शकतात. Mainframe Computers आणि Open Systems. मी mainframe computers वर काम करतो.

कामाचे स्वरूप
१> आग विझवणे काम अर्थात Production Support
२> डागडुजी काम अर्थात Maintenance Work
३> सुधारणा काम अर्थात Development Work

१> आग विझवणे काम अर्थात Production Support
दैनंदिन चालणारी batch process सुरळीतपणे चालू ठेवणे. ती दिलेल्या विशिष्ट वेळात पूर्ण करणे ही production support वर काम करणाऱ्या समूहाची जबाबदारी असते. तसेच कोणत्याहि स्क्रीन मध्ये काही प्रश्न निर्माण झाल्यास तो ह्या समूहास सोडवावा लागतो.

२> डागडुजी काम अर्थात Maintenance Work
Computer program मध्ये छोट्या सुधारणा करणे आणि या सुधारणा अमलात आणणे हे ह्या समूहाचे काम असते.

३> बांधकाम काम अर्थात Development Work
कॉम्पुटर प्रोग्राम मधील भव्य रूपातील सुधारणाचे काम हा समूह करतो.

स्वतःचे IT Dept कि Outsourcing
या मोठ्या कंपन्या (ICICI Bank, American Express) पुढे एक प्रश्न असतो तो म्हणजे स्वतःचे IT Dept ठेवायचे कि Outsourcing करायचे? TCS, Infosys, HCL, Polaris वगैरे outsourcing contract स्वीकारणाऱ्या कंपन्यांची उदाहरणे होत.

Outsourcing Contract चे प्रकार
Outsourcing Contract हे fixed price किंवा Time & Material प्रकारचे असू शकते.

या पुढील भाग पुन्हा कधी तरी!

अनुप, दीपक, दर्शन, वैभव (बॉब) , अजय आणि IT Industry मध्ये काम करणाऱ्या मित्रांना विनंती आहे कि त्यांनी आपल्या प्रतिक्रिया मला कळवाव्यात आणि लेखातील त्रूटी भरून काढण्यास मदत करावी

(Disclaimer - या लेखातील माहिती पूर्णपणे माझ्या ज्ञान / अज्ञानावर अवलंबून आहे. माझे ज्ञान/अज्ञान अचूक असेल याची मी हमी देणार नाही!)

No comments:

Post a Comment