का कुणास ठाऊक मी आधुनिक कधी बनूच शकलो नाही. अगदी जुन्या काळातील पठडीचा नसलो तरी ७० - ८० च्या काळाच्या मानसिकतेतून मी अजूनही बाहेर पडलो नाही, आणि त्याची खंतही वाटत नाही. मॉल, फेसबुकची मानसिकता, भ्रमणध्वनीचा अतिरेकी वापर, प्रत्येक व्यक्तीने नव्याने शोधलेले व्यक्तीस्वातंत्र्य, प्रगतीच्या वाटा ह्या सर्व गोष्टी बघून जुनीच मानसिकता बरे असे वाटते. नवीन काळाची अजून एक खुण म्हणजे FM रेडिओ आणि त्यावरील निवेदकांची बाष्कळ बडबड. त्यापासून पळवाट म्हणून मी मुंबई ब चा आधार घेतला. माझी कार्यालयाची वेळ दुपारी एकची, मराठी गाण्यांच्या वेळेचा शोध घेता घेता मुंबई ब वरील शास्त्रीय संगीत ह्या कार्यक्रमाचा शोध लागला. मला शास्त्रीय संगीताचा गंध नाही परंतु ह्या कार्यक्रमांच्या २ -३ भागांचे श्रवण केल्यानंतर मी त्यांच्या प्रेमात पडलो. सकाळी थोडा वेळ कार्यालयीन काम केल्यानंतर कार्यालयात निघण्याआधी मी एक अर्धा-एक तासांची ताकदवान डुलकी :) घेतो. अशा वेळी १० वाजता मुंबई ब वरचा हा कार्यक्रम मला अतिशय एक सुखद शांतातादायी अनुभव देऊन जातो. मन अगदी एका वेगळ्या विश्वात निघून जाते.
अजूनही जुन्या बर्याच चांगल्या गोष्टी अस्तिवात आहेत. गरज आहे त्यांचे चांगलेपण कौतुकण्याची, आणि त्यांची माहिती एकमेकांना देण्याची!
चांगलेपण कौतुकण्याची, आणि त्यांची माहिती एकमेकांना देण्याची! <<< याचसाठी ब्लॉगहट्ट..
ReplyDeleteDhanyavad! I have started going through your blogs...Look very interesting..
Delete