आपण बर्याच वेळा 'Bigger Picture' हा शब्द ऐकतो. हल्ली क्रिकेट खेळाडू हा शब्द वापरताना दिसतात. ५ सामन्याच्या मालिकेत ३-० अशी विजयी मालिका घेतल्यावर चौथ्या आणि पाचव्या सामन्यात ज्यावेळी आपणास अशोक दिंडा आणि वर्धमान साहा हे खेळाडू खेळताना दिसतात त्यावेळी भारतीय निवड समितेने मोठे चित्र अर्थात २०११ सालचा विश्वचषक लक्षात घेवून हा निर्णय घेतल्याचे आपण खुशाल समजावे.
आता ही संकल्पना वैयक्तिक जीवनात योग्य ठिकाणी योग्य वेळी वापरली तर नक्कीच फायदा होऊ शकतो. शालेय जीवनात केवळ गुणांना महत्त्व देवून तात्कालिक बाबींना महत्त्व द्यावे की मुलभूत संकल्पनाकडे लक्ष देवून मोठ्या चित्राकडे ध्यान द्यावे हा प्रत्येकाचा प्रश्न! आपल्या जीवनाचे समजा आपण महत्त्वाचे ध्येय ठरविले आणि छोटे मोठे निर्णय ह्या ध्येयाशी सुसंगत असे घेतले तर आपण मोठे चित्र लक्षात घेतले असे खुशाल समजावे.
आता ह्या मोठ्या चित्राची संकल्पना येण्यासाठी अजून एक संकल्पना समजणे आवश्यक आहे आणि ती म्हणजे १०००० फुटांवरून घेतलेला आढावा! हा आढावा आपल्या मनाने घ्यावा लागत असल्याने मनाला मोठी भरारी घेता येणे आवश्यक आहे!
थोडक्यात म्हणजे आपल्या मनाने उंच भरारी घेवून १०००० फुटांवरून आपल्या आयुष्याचे मोठे चित्र रेखाटा आणि महत्त्वाचे निर्णय हे मोठे चित्र लक्षात ठेवूनच घ्या!
No comments:
Post a Comment